Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाBCCIने सुरू केली आयपीएल २०२४ची तयारी, लिलावाची तारीख आली समोर

BCCIने सुरू केली आयपीएल २०२४ची तयारी, लिलावाची तारीख आली समोर

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) १७व्या भागाची तयारी सुरू केली आहे. बीसीसीआय आयपीएलसह महिला प्रीमियर लीगचीही (WPL) रूपरेषा तयार करत आहे. अशातच बातमी आहे की आयपीएल आणि डब्लूपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव डिसेंबरमध्ये होऊ शकतो.

आयपीएल २०२४साठीचा खेळाडूंचा लिलावा परदेशात होण्याची आशा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ खेळाडूंच्या लिलावाचे आयोजन १५ ते १९ डिसेंबरदरम्यान करू शकतो. वेबसाईट क्रिकबझच्या बातमीनुसार, आयपीएल २०२४साठी खेळाडूंचा लिलाव दुबईत आयोजित केला जाऊ शकतो. बीसीसीआय महिला खेळाडूंच्या लिलावाचे आयोजन देशात ९ डिसेंबरला करू शकतो.

फ्रेंचायझीला अधिकृत सूचना नाही

भारतीय मंडळाने लिलावाबाबत फ्रेंचायझीला अद्याप कोणतीही अधिकृत सूचना दिलेली नाही. गेल्या वर्षी बीसीसीआयने आयपीएलच्या १६व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलावा इस्तांबुलमध्ये करण्याचा विचार केला होत. मात्र त्यानंतर त्याचे आयोजन कोचीमध्ये करण्यात आले. यामुळे दुबईमध्ये लिलावाची योजना अस्थायी असू शकते. दरम्यान,सर्व आयपीएल संघांना लिलावाचे ठिकाण म्हणून दुबईचा विचार करण्यासाठी सांगण्यात आले आहे.

फेब्रुवारीमध्ये होऊ सकते डब्लूपीएलचे आयोजन

महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या हंगामाचे आयोजन फेब्रुवारीमध्ये होऊ शकते. दरम्यान, मंडळाकडून आतापर्यंत फ्रेंचायझी टीमना लिलावाची तारीख आणि ठिकाणाबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. भारतीय महिला क्रिकेट संघ जानेवारीच्या मध्यापर्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्यात बिझी असेल. गेल्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन मुंबईत झाले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -