Monday, May 13, 2024
Homeक्रीडाBCCI : स्टिंग ऑपरेशननंतर बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचा राजीनामा

BCCI : स्टिंग ऑपरेशननंतर बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांचा राजीनामा

नवी दिल्ली : बीसीसीआय (BCCI) म्हणजेच भारतीय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी राजीनामा दिला आहे. चेतन शर्मा यांनी त्यांचा राजीनामा बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांच्याकडे सुपूर्द केला असून जय शाह यांनी चेतन शर्मा यांचा राजीनामा मंजूर केला आहे. स्टिंग ऑपरेशननंतर चेतन शर्मा यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

अलीकडेच चेतन शर्मा यांच्यावर एका वृत्तवाहिनीने स्टिंग ऑपरेशन केले होते, अनेक बाबी समोर आल्या होत्या. यादरम्यान चेतन शर्मा यांनी सौरव गांगुली आणि विराट कोहली यांच्यातील वादापासून ते खेळाडूंना तंदुरुस्त ठेवण्यासाठी इंजेक्शनच्या वापरापर्यंतची अनेक धक्कादायक माहिती उघड केल्याचे समोर आले होते. त्यांच्या या स्टिंग ऑपरेशनमुळे बीसीसीआयवर अनेक प्रश्नचिन्ह उभारले जात होते.

बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक वक्तव्यं केली होती. यामुळे भारतीय क्रिकेट विश्वात चांगलीच खळबळ माजली होती. चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

दरम्यान, बीसीसीआयकडून कारवाई होण्याआधीच चेतन शर्मा यांनी पदावरून पायउतार होण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. चेतन शर्मा यांनी बीसीसीआयच्या सचिवांकडे दिलेला राजीनामा मान्य करण्यात आल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -