Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023: विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, राहुल-कुलदीपला संधी

World Cup 2023: विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा, राहुल-कुलदीपला संधी

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ यावेळेस आशिया चषक २०२३ (asia cup 2023) खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघ मायदेशातच क्रिकेट विश्वचषक (world cup 2023) खेळणार आहे. यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. भारतीय संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात विश्वचषक खेळणार आहे.

भारताने घोषित केलेल्या १५ सदस्यीय संघात युझवेंद्र चहलला पुन्हा नाकारण्यात आले आहे. आशिया कपमध्ये ट्रॅव्हल रिझर्व्ह म्हणून सामील असलेल्या संजू सॅमसनलाही या यादीतून वगळण्यात आले आहे. तिलक वर्मालाही संधी मिळालेली नाही. आशिया चषकात एकही सामना न खेळलेल्या केएल राहुलला मात्र विश्वचषकात संधी मिळाली आहे.

वनडे वर्ल्डकप २०२३ची सुरूवात ५ ऑक्टोबरपासून होत आहे. पहिलाच सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवला जाणार आहे. न्यूझीलंड गेल्यावेळेस वर्ल्डकपच्या फायनलमध्ये हरला होता. यावेळेस वर्ल्डकपचा फायनल सामना १९ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये खेळवला जाईल.

विश्वचषक २०२३साठी मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्माने आज संघाची घोषणा केली.

विश्वचषकासाठी टीम इंडिया

रोहित शर्मा(कर्णधार)
विराट कोहली
जसप्रीत बुमराह
शुभमन गिल
केएल राहुल
हार्दिक पांड्या(उप कर्णधार)
श्रेयस अय्यर
रवींद्र जडेजा
इशान किशन
सूर्यकुमार यादव
कुलदीप यादव
मोहम्मद सिराज
मोहम्मद शमी
अक्षर पटेल
शार्दूल ठाकूर

केएल राहुलच्या नावाने आश्चर्य

टीम इंडियामध्ये सगळ्यात मोठी बातमी म्हणजे विश्वचषकाच्या संघात के एल राहुलला संधी देण्यात आली आहे. राहुलला वर्षाच्या सुरूवातीला आयपीएलमध्ये दुखापत झाली होती दरम्यान तो बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत आहे आणि आशिया चषकातील पुढील सामन्यांमध्ये टीम इंडियासोबत असण्याची शक्यता आहे.

१४ ऑक्टोबरला होणार भारत-पाकिस्तान सामना

असे पहिल्यांदाच होत आहे की भारत एकटाच विश्वचषकाचे यजमानपद सांभाळत आहे. याआधी १९८७, १९९६ आणि २०११मध्ये वर्ल्डकपचे संयुक्त यजमानपद केले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबरला सामना खेळवला जाणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -