Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीBank Holiday November: नोव्हेंबरमध्ये बँका राहणार इतके दिवस बंद, आजच करून घ्या...

Bank Holiday November: नोव्हेंबरमध्ये बँका राहणार इतके दिवस बंद, आजच करून घ्या कामे

मुंबई: नोव्हेंबरमध्ये(november) दिवाळीसारखा मोठा सण येत आहे. त्याचप्रमाणे उत्तरेलाही छठपुजेचे अधिक महत्त्व असते. त्यामुळे अनेक ठिकाणी बँका बंद(bank holiday) राहणार आहेत. तुमचीही बँकेची काही महत्त्वाची कामे असतील तर ती आजच उरकून घ्या नाहीतर पश्चाताप करावा लागेल.

तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. सोबतच चार रविवार असतात. त्यामुळे आधीच हे सुट्टीचे ६ दिवस होतात. आरबीआयच्या कॅलेंडरनुसार नऊ सुट्ट्या सणांच्या तसेच सरकारी आहेत. याशिवाय काही बँकांना तेथील सणांनुसार सुट्टी असते. विविध राज्यांतील बँकांमध्ये या सुट्ट्या बदलत असतात.

१ नोव्हेंबरला कन्नड राज्योत्सव, कूट, करवा चौथमुळे कर्नाटक, मणिपूर आणि हिमाचल प्रदेशातील बँका बंद आहेत. १० नोव्हेंबरला वंगाला महोत्सवामुळे आगरतळा, डेहराडून, गंगटोक, इंफाळ, कानपूर आणि लखनऊमध्ये बँका बंद राहतील. भारतातील अधिकाधिक राज्यांमध्ये नोव्हेंबर ११-१४ या कालावधीत मोठ्या सुट्ट्या असतील. १३ आणि १४ नोव्हेंबरला दिवाळीमुळे अनेक शहरातील बँका बंद असतील. ११ला दुसरा शनिवार आणि १२ ला रविवार आहे.

काही राज्यात भाऊबीजेच्या सणालाही १५ नोव्हेंबरला सुट्टी असेल. २०नोव्हेंबरला छठ पुजेमुळे बिहार आणि छत्तीसगडमध्ये बँका बंद राहतील. २३ नोव्हेंबरला उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये बँका बंद राहतील.

नोव्हेंबरमध्ये आणखी एक मोठा आठवडा २५ ते २७ नोव्हेंबरपर्यंत चौथा शनिवार, रविवार आणि गुरूनानक जयंतीमुळे बँका बंद राहतील. ३० नोव्हेंबरला कनकदास जयंतीमुळे कर्नाटकात बँका बंद राहतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -