Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिकमजेत मस्त तंदुरुस्तमासिक पाळी, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत 'उजास' तर्फे जनजागृती कार्यशाळेचे आयोजन

मासिक पाळी, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत ‘उजास’ तर्फे जनजागृती कार्यशाळेचे आयोजन

५००हून अधिक शाळांमधील जनजागृती कार्यशाळेच्या माध्यमातून १ लाख मुलींपर्यंत पोहोचण्याचे उदिष्ट्य

मुंबई : आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टचा सामाजिक उपक्रम ‘उजास’ या वर्षी मासिक पाळी, आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृती कार्यशाळा आयोजित करणार आहे. या कार्यशाळेद्वारे ५०० शाळा आणि १ लाखाहून अधिक किशोरवयीन मुलींपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

महिलांच्या आरोग्य, विकास आणि शिक्षणाच्या बाबतीत बरीच प्रगती होऊनही भारतात मासिक पाळी अजूनही वर्जित मानली जाते. आजही ७१ टक्के मुलींना मासिक पाळी येईपर्यंत माहिती नसते. ५० टक्के पेक्षा जास्त मुलींना मासिक पाळीच्या योग्य स्वच्छतेबद्दल माहिती नसते. परिणामी, ११ ते १४ वयोगटातील २.३ कोटी अधिक मुली शाळा सोडतात, असे निष्कर्ष ‘उजास’ने काढले आहेत.

यासाठी ७ महिन्यांपूर्वी स्थापना झाल्यापासून, ‘उजास’ने १३४ शाळांमध्ये नवीन सुरुवात केली आहे. उपेक्षित समाजातील किशोरवयीन मुलींमध्ये ३,२२,२४८ हून अधिक सॅनिटरी नॅपकिनचे वाटप केले. जेथे मर्यादित प्रवेश आणि मासिक पाळी आरोग्य आणि उत्पादनांबद्दल जागरूकता आहे. उजास वयानुसार शिक्षण मॉड्यूल्सद्वारे मासिक पाळी व्यवस्थापनाच्या विविध प्रकार १० ते १६ वयोगटातील किशोरवयीन मुलींना शिक्षण देते. यासोबतच मुलींना आणि त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांना तात्काळ मदत करत आहे.

जनजागृती कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनातून मासिक पाळीबद्दल संवाद आणि जागृती सुरू करून जागरूकता निर्माण करणे. मासिक पाळीला सुरक्षित आणि आरोग्यदायी मार्गाने शाश्वत आणि मोफत पर्याय उपलब्ध करून देऊन ती मिथकांनाही तोडत आहे. सकारात्मक यशाचा दर पाहून, संघाने पुढील ५ वर्षात उजास संपूर्ण भारतात कार्यशाळा घेण्याची योजना जाहीर केली आहे.

‘उजास’तर्फे आतापर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, अमरावती, वाशीम, जालना, पुणे, सांगली, गडचिरोली, यवतमाळ, अहमदनगर, महाड, कोल्हापूरसह १३ जिल्ह्यांमध्ये कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -