Monday, May 13, 2024
Homeक्रीडाAsian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारीमध्ये तब्बल ४० वर्षांनंतर भारताला...

Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत घोडेस्वारीमध्ये तब्बल ४० वर्षांनंतर भारताला सुवर्णपदक

स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी भारताची तिसरी सुवर्ण कामगिरी

हांगझोऊ : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये (Asian Games 2023) चार घोडेस्वारांच्या शानदार कामगिरीमुळे भारताने आपले तिसरे सुवर्णपदक पटकावले आहे. भारताच्या या घोडेस्वारी संघात अनुष अगरवाल, सुदीप्ती हजेला, हृदय विपूल छेडा आणि दिव्याकृती सिंग यांचा समावेश होता. याआधी नेमबाजांनी मंगळवारी १० मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत तर महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेवर मात करत सुवर्ण पटकावले होते. त्यानंतर घोडेस्वारीमध्ये मिळालेले पदक हे यावर्षीचे तिसरे सुवर्णपदक आहे. तब्बल ४० वर्षांनंतर भारताला घोडेस्वारीमध्ये (Equestrian dressage) सुवर्ण मिळाल्याने सर्वच स्तरांतून भारताच्या घोडेस्वारांचे कौतुक होत आहे.

घोडेस्वारांच्या चमूने मिळून सर्वाधिक २०९.२०५ गुणांची कमाई केली. दिव्याकृती सिंगला ६८.१७६ गुण, हृदयला ६९.९४१ गुण आणि अनुषला ७१.०८८ गुण मिळाले. भारतीय संघ चीनपेक्षा ४.५ गुणांनी पुढे होता. त्यामुळे हे सुवर्ण भारताच्या नावावर झाले. याआधी १९८२ मध्ये दिल्ली येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने या क्रीडा प्रकारात सांघिक गटाचे सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर तब्बल ४० वर्षांनी भारताला सुवर्ण मिळवण्यात यश आले आहे.

सध्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या एकूण पदकांची संख्या १४ इतकी झाली आहे. यामध्ये तीन सुवर्णपदकांचा समावेश आहे. त्याशिवाय चार रौप्य आणि सात कांस्य पदके मिळाली आहेत. भारताला आपल्या खेळाडूंकडून आणखी पदकांची अपेक्षा आहे. महिला क्रिकेटनंतर पुरुष क्रिकेटमध्येही सुवर्णपदक मिळण्याची आशा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -