Friday, May 17, 2024
Homeक्रीडाAsia Cup 2023: तर भारत-पाकिस्तान सामना होऊ शकतो रद्द...जाणून घ्या कारण

Asia Cup 2023: तर भारत-पाकिस्तान सामना होऊ शकतो रद्द…जाणून घ्या कारण

मुंबई: आशिया चषकाची (asia cup 2023) सुरूवात पाकिस्तानी संघाने(pakistan team) जबरदस्त केली आहे. कर्णधार बाबर आझमने नेपाळविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात जबरदस्त शतकी खेळी केली. स्पर्धेच्या १६व्या हंगामातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने ग्रुप ए मधील सामन्यात नेपाळवर २३८ धावांनी मोठा विजय मिळवला. हा आशिया चषकातील पाकिस्तानचा मोठा विजय आहे.

बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद यांच्या शतकांच्या जोरावर पाकिस्तानने सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना ३४२ धावांचा स्कोर उभा केला होता. प्रत्युत्तरात नेपाळचा संघ केवळ १०४ धावांवर कोसळला. लेग स्पिनर शादाब खानने ४ विकेट मिळवल्या. आता पाकिस्तानचा ग्रुप राऊंडमधील पुढील सामना २ सप्टेंबरला होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २ सप्टेंबरला शनिवारी श्रीलंकेच्या कँडीमध्ये खेळवला जाणार आहे. या दिवशी ९० टक्के पावसाची शक्यता आहे. अशातच सामना रद्दही होऊ शकतो. याचा फायदा पाकिस्तान आणि बाबर आझम यांना मिळेल. Weather.com च्या माहितीनुसार कँडीमध्ये २ सप्टेंबरला केवळ पाऊसच पडणार नाही तर जोरदार वारेही वाहण्याची शक्यता आहे तसेच दिवसभर ढग राहतील. अशातच मैदान ओले झाल्यास ते सुकण्याची शक्यता कमी आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे.

पाकिस्तानचा संघ पोहोचणार सुपर ४मध्ये

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना एक एक पॉईंट मिळेल. सामन्यासाठी कोणताही रिझर्व्ह डे ठेवण्यात आलेला नाही. अशातच पाकिस्तानचे २ सामन्यात ३ गुण होतील. तर टीम सुपर ४ साठी क्वालिफाय करतील. तर ४ सप्टेंबरला भारत आणि नेपाळ यांच्यात होणाऱ्या सामन्याचा विजेता सुपर ४मध्ये पोहोचणारा दुसरा संघ ठरेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -