Saturday, May 18, 2024
Homeक्रीडाअश्विन, जडेजा अव्वल स्थानी आजसीसीची कसोटी क्रमवारी जारी

अश्विन, जडेजा अव्वल स्थानी आजसीसीची कसोटी क्रमवारी जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेनंतर आयसीसीने कसोटी क्रमवारी जारी केली. गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा स्टार गोलंदाज रविचंद्रन अश्विनने अव्वल स्थानी झेप घेतली. रविंद्र जडेजाने अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर कब्जा केला आहे. शेवटच्या कसोटीत शतक ठोकणाऱ्या विराट कोहलीने आठ क्रमांकाची झेप घेत १३ व्या क्रमांकावर पोहचला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने दमदार कामगिरी केली. तसेच रविंद्र जडेजानेही अष्टपैलू खेळ करत भारताला बॉर्डर-गावस्कर मालिका २-१ अशी जिंकून दिली. त्याचा फायदा या दोन्ही खेळाडूना झाला. आयसीसीने नुकतीच कसोटी क्रमवारी जारी केली. त्यानुसार गोलंदाजांच्या क्रमवारीत अश्विनने अव्वल स्थान गाठले आहे. ८६९ रेटिंगसह अश्विन कसोटीत अव्वल स्थानावर आहे. जेम्स अँडरसनला मागे टाकत अश्विनने पहिल्या स्थानावर कब्जा केला. अष्टपैलू खेळाडूमध्ये रविंद्र जडेजा पहिल्या स्थानावर आहे.

मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात शतक ठोकणाऱ्या विराट कोहलीने फलंदाजांच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली. कसोटीत आठ क्रमांकाची झेप घेत विराट कोहली १३व्या क्रमांकावर पोहचला आहे. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज होता. अखेरच्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने १८६ धावांची खेळी केली होती. यामुळे विराट कोहलीने आठ क्रमांकाची झेप घेत १३वे स्थान गाठले. १८६ धावांच्या दमदार खेळीमुळे विराट कोहलीला ५४ रेटिंगचा फायदा झाला. विराट कोहलीशिवाय कर्णधार रोहित शर्मालाही एका क्रमांकाचा फायदा झाला. ७३९ रेटिंगसह रोहित शर्मा दहाव्या स्थानावर पोहचला आहे. ऋषभ पंत कसोटी क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे.

अष्टपैलूंत पहिले दोन भारतीय खेळाडू

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठीच्या मालिकेत अक्षर पटेलने अष्टपैलू खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. अक्षरने २६४ धावा जमवत गोलंदाजीतही बळी मिळवले. त्याच बळावर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अक्षर पटेल चौथ्या स्थानावर पोहचला. रविंद्र जडेजा अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. तर रविचंद्रन अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे अव्वल चार अष्टपैलू खेळाडूंमध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -