Monday, May 20, 2024
Homeमहत्वाची बातमीआर्यन खान ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत

आर्यन खान ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत

अन्य सात आरोपींची कोठडीही वाढली

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याने जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली असतानाच विशेष एनडीपीएस कोर्टाने गुरूवारी आर्यन व अन्य सात आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. आर्यनला सध्या आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे. कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाने आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट तसेच मूनमून धामेचा यांच्यासह आठ जणांना अटक केली होती. या सर्वांची एनसीबी कोठडीतून नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या कोठडीची मुदत संपल्याने सर्वांना आज कोर्टात हजर करण्यात आले असता सर्वांच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आर्यनचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

दरम्यान, आर्यन, अरबाज आणि मूनमून या तिघांनी जामिनासाठी केलेला अर्ज कालच विशेष एनडीपीएस कोर्टाने फेटाळला. त्यानंतर आर्यनने जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी या अर्जावरील सुनावणीसाठी तारीख दिली असून येत्या मंगळवारी २६ ऑक्टोबर रोजी या अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यनला दिलासा मिळणार की नाही हे आता या अर्जावरील सुनावणीनंतरच स्पष्ट होणार आहे. आर्यन सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. शाहरुख खानने सकाळी कारागृहात जाऊन आर्यनची भेट घेतली. भेटीसाठी दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. कोविडचे निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर आजपासूनच कारागृहात नातेवाईकांना भेट घेण्याची मुभा देण्यात आली असून आर्यन कोठडीत असल्यापासून प्रथमच शाहरुख त्याच्या भेटीला पोहचला. १४ दिवसांनंतर गुरुवारी सकाळी शाहरुख खान आर्यनला भेटला. वडील आणि मुलाची १५ मिनिटांची ही भेट अतिशय भावनिक होती. आर्यन खान त्याच्या वडिलांना पाहून रडल्याची माहिती सूत्राच्या हवाल्याने दिली आहे. आर्थर रोड कारागृहातील सूत्रांनी शाहरुख खान आणि आर्यन खानच्या भेटीचा आतील तपशील दिला आहे. त्यानुसार, दोघांची ही भेट अतिशय भावनिक होती. शाहरुख खान जेव्हा आपल्या मुलाला भेटत होता, त्यावेळी २ जेलरक्षक तेथे उपस्थित होते. या दोघांनी इंटरकॉमद्वारे एकमेकांशी संवाद साधला. दोघांच्या मध्ये ग्रील आणि काचेची भिंत होती. शाहरुख खानने आर्यनला विचारले की तो चांगले खात आहे का? ज्याला आर्यनने नकार दिला. आर्यन शाहरुख खानला सांगितले की, मला जेलमधले जेवण आवडत नाही. त्यानंतर शाहरुखने तुरुंग अधिकाऱ्यांना विचारले की ते आर्यनला घरचे जेवण देऊ शकतो का? यावर तुरुंग अधिकाऱ्यांनी शाहरुख खानला सांगितले की त्याला घरच्या जेवण्यासाठी कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल. या भेटीदरम्यान शाहरुख खानने आपल्या मुलाला धीर देण्याचा प्रयत्न केला.

आर्यनला भेटण्यासाठी शाहरुख कारागृहात

बुधवारी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान आर्यन खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दुसरीकडे गुरुवारी सकाळी आर्यन खानला भेटण्यासाठी शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात पोहोचला होता.

अनन्या पांडेच्या घरावरही छापा

एनसीबीने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला. मुंबईच्या वांद्रे येथील तिच्या घरावर हा छापा टाकण्यात आला. या प्रकरणात अजून फारशी माहिती समोर आलेली नाही, पण असे मानले जाते की एनसीबीचा हा छापा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असू शकतो. अनन्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची मैत्रीण आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम राबवण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -