Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीISIS : इसिसच्या नवीन म्होरक्याची नियुक्ती

ISIS : इसिसच्या नवीन म्होरक्याची नियुक्ती

इसिसच्या म्होरक्याचा खात्मा केल्याने जाहीर केला नवा 'चीफ'

सीरिया : इस्लामिक स्टेट (इसिस-ISIS) या कुख्यात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू अल-हसन अल-हाश्मी अल-कुरेशीचा एका चकमकीत मृत्यू झाल्याटी माहिती इसिसच्या प्रवक्त्याने टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेल्या ऑडिओ संदेशात दिली आहे. यात प्रवक्ता म्हणाला आहे की, इसिसने अबू अल-हुसेन अल-हुसैन अल-कुरेशी याची दहशतवादी संघटनेचा नवा नेता म्हणून निवड केली आहे. अबू अल-हसन अल-हाश्मी अल-कुरेशी विरोधी गटाशी झालेल्या गोळीबारात मारला गेल्याचे प्रवक्त्याने सांगितले. मात्र ऑडिओमध्ये इसिसच्या नव्या नेत्याच्या नावाव्यतिरिक्त इतर कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

इसिसने मार्चमध्ये आधीचा म्होरक्या अबू इब्राहिम अल-हाश्मी अल-कुरेशी याच्या मृत्यूनंतर अबू अल-हसन अल-हाश्मी अल-कुरशीला आपला नवीन नेता म्हणून घोषित केले होते. दोन इराकी सुरक्षा अधिकारी आणि एका पश्चिमेकडील सुरक्षा स्रोताच्या म्हणण्यानुसार कुरेशी आयएस संघटनेचा माजी खलीफा अबू बकर अल-बगदादीचा भाऊ होता.

कुरेशी आणि बगदादी या दोघांनीही उत्तर सीरियातील त्यांच्या तळांवर अमेरिकेच्या छाप्यांदरम्यान स्वतःला आणि कुटुंबातील सदस्यांना बॉम्बस्फोट घडवून ठार केले. गेल्या दशकात शेजारच्या सीरियातील युद्धाच्या गोंधळातून उदयास आलेल्या इस्लामिक स्टेटने २०१४ मध्ये इराक आणि सीरियाचा मोठा भाग ताब्यात घेतला आहे.

इसिसने आपल्या क्रूर राजवटीत चुकीच्या पद्धतीने युवकांना विचारधारेखाली आणले आणि त्याच विचारधारेच्या नावाखाली हजारो लोकांची हत्या केली आहे. इराकी आणि आंतरराष्ट्रीय सैन्याने २०१७ मध्ये मोसुलमध्ये या गटाचा पराभव केला. त्यानंतर इसिसचे हजारो दहशतवादी अलिकडच्या वर्षांत बहुतेक दुर्गम भागात लपून बसले आहेत. असे असले तरीही ठराविक अंतराने मोठे हल्ले करून जनजीवनावर परिणाम करण्यात ही संघटना कुविख्यात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -