Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीसावित्री वसतिगृहातील तरुणी हत्या प्रकरणात आणखी एक धागा हाती

सावित्री वसतिगृहातील तरुणी हत्या प्रकरणात आणखी एक धागा हाती

शवविच्छेदन अहवाल पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : मरीन ड्राइव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका २० वर्षांच्या तरुणीचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे शवविच्छेदन अहवालातून समजल्याने या प्रकरणाला वेगळीच दिशा मिळाली आहे.

शवविच्छेदन अहवालात मृत मुलीच्या शरीरावर लैंगिक अत्याचार झाल्याच्या खुणा नसल्याचे म्हटले आहे. मुलीच्या खाजगी आणि संवेदनशील भागांवर लैंगिक अत्याचारासंबंधी काही आढळून आलं नसल्याचं समोर आलं आहे. मात्र डीएनए चाचणीसह अन्य चाचण्या केल्यानंतरच लैंगिक अत्याचार झाला होता की नाही याबाबत स्पष्टता येईल.

मृतदेह आढळल्यावरची परिस्थिती पाहून पोलिसांनी प्राथमिक तपासात समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे हत्या आणि भारतीय दंड संहितेच्या ३७६ अन्वये बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. शवविच्छेदन अहवाल काही वेगळंच सांगत असला तरी डीएनए व अन्य चाचण्या केल्यानंतर यासंबंधी ठोस माहिती मिळेल.

संबंधित बातम्या –

सावित्रीबाई फुले हॉस्टेलमध्ये तरुणीची हत्या करुन सुरक्षारक्षकाची आत्महत्या!

‘त्या’ हत्येनंतर अन्य मुली घाबरल्या, हॉस्टेल सोडून गेल्या

 

राज्यातील सर्व वसतिगृहात विद्यार्थिनी सुरक्षित आहेत काय?

वसतिगृहातील हत्याकांडाला महाआघाडी सरकारच जबाबदार!

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -