Sunday, May 19, 2024
Homeदेशकाँग्रेसला आणखी एक मोठा झटका, पंजाबमध्ये आपची एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा

काँग्रेसला आणखी एक मोठा झटका, पंजाबमध्ये आपची एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा

नवी दिल्ली: देशात निवडणूक ऐन तोंडावर आली आहे. भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी मिळून इंडिया गठबंधनाचा पाया रचला होता. मात्र एक एक करून गठबंधन पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना दिसत आहे. यात आता आणखी एक धक्का बसला आहे.

काँग्रेसला आणखी एक मोठा झटका देताना पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने गठबंधन तोडत एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. या घोषणेआधी आम आदमी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीत आसामच्या तीन जागांसाठी उमेदवारांची नावांची गुरूवारी घोषणा केली.

आपचे राज्यसभा सदस्य संदीप पाठक यांनी तीन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यांनी सांगितले की दिब्रूगढमधून मनोज धनोहर, गुवाहाटी येथून भावेन चौधरी आणि सोनितपूर येथून ऋषी राज यांना उमेदवार बनवण्यात आले आहे.

आम आदमी पक्षाचे पंजाब प्रभारी आणि राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी अधिकृतपणे गठबंधन न करण्याबाबतची घोषणा केली. जागा वाटपा कमिटीने पंजाबमध्ये गठबंधन न करण्याचा निर्णय घेतल्याचे संदीप पाठक म्हणाले. येथे १३ लोकसभेच्या जागा असलेल्या पंजाबमध्ये भगवंत मान यांच्या नेतृत्वात आम आदमी पक्षाचे सरकार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -