Saturday, May 18, 2024
Homeमहत्वाची बातमीरामदास कदमांच्या आरोपवर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया

रामदास कदमांच्या आरोपवर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : राजकारणात आरोप-प्रत्यारोप हे होतच असतात. पण आजचा दिवस गाजलो तो शिवसेनेच्या पक्षांतर्गत राजकारणामुळे…शिवसेनेतील अंतर्गत वाद आज चव्हाट्यावर आला. आज पत्रकार परिषदेते रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले. रामदास कदम पत्रकार परिषदेत म्हणाले की,  अनिल परब यांनी मनसे आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांना हाताशी धरुन आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला आहे. रामदास कदम यांनी केलेल्या घाणाघाती आरोपवर अनिल परब यांनी मात्र बोलणं टाळलं आहे. अनिल परब यांना यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, मी याबाबतीत काही बोलू इच्छित नाही. माझ्यावर काहीही आरोप केले तरी मी काही बोलणार नाही. मी एक शिवसैनिक आहे. ते शिवसेना नेते आहेत. याबाबत जी काही दखल घ्यायची ती पक्ष घेईल, असं परब यांनी म्हटलं आहे.

पत्रकार परिषदेत रामदास कदम नेमकं काय म्हणाले ?

 स्थानिक आमदारांना डावलून सातत्याने आमच्या मुळावर उठण्याचे काम अनिल परब यांनी केले आहे. गद्दार कोण हे महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना कळले पाहिजे. अनिल परबांना मंत्रीपद मिळाल्यानंतर ते पक्षासोबत गद्दारी करत आहेत. दापोली आणि मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अनिल परबांनी सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्र करुन दोन उमेदवार निश्चित केले आहेत. त्याबाबत पक्षाला कळवल्यानंतर त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या निवडणुकीसाठी अनिल परब यांनी त्यांच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये बैठक बोलवली होती. त्याला सुनील तटकरे आणि शिवसेना विरोधात काम करणारे सूर्यकांत दळवी यांना बोलावले होते. पक्षाची निष्ठा आम्हाला शिकवणारे उदय सामंत यांनाही त्यांनी बोलवले होते. त्यानंतर तिकिट वाटप करुन राष्ट्रवादीला पहिले अडीच वर्षाचे नगराध्यक्ष पद दिले. शिवसेना राष्ट्रवादीकडे गहाण ठेवणारे अनिल परब गद्दार की रामदास कदम गद्दार? शिवसेनेला राष्ट्रवादीच्या घश्यामध्ये टाकणारे अनिल परब निष्ठावान कसे असू शकतात, असा सवाल कदमांनी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -