Saturday, May 18, 2024
Homeमहत्वाची बातमीNepal Earthquake: नेपाळमध्ये सकाळी सकाळी भूकंपाने हादरली जमीन, ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे...

Nepal Earthquake: नेपाळमध्ये सकाळी सकाळी भूकंपाने हादरली जमीन, ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे झटके

काठमांडू: नेपाळच्या(nepal) मकवानपूर जिल्ह्यातील चितलांगमध्ये ४.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे झटके(earthquake) जाणवले. नेपाळ भूकंप विज्ञान केंद्रानुसार भूकंपाचे झटके गुरूवारी सकाळी सकाळी जाणवले. दरम्यान, यामुळे आतापर्यंत कोणतेही मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळालेली नाही. नेपाळमध्ये याच महिन्याच्या सुरूवातीला ३ नोव्हेंबरला ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धकके बसले होते. यातून नेपाळ सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

नेपाळमध्ये जाणवलेल्या ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जिवितहानी तसेच वित्तहानी झाली होती. या भूकंपात तब्बल १५७ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता तर हजारोंच्या संख्येने जखमीही झाले होते.

भारताने पाठवली नेपाळला मदत

नेपाळमध्ये नुकतेच भूकंपाचे जोरदार झटके जाणवले होते. यामुळे तेथील प्रचंड मोठे नुकसान झाले. गेल्या ३ नोव्हेंबरला नेपाळच्या जाजरकोटमध्ये जाणवलेल्या भूकंपाच्या झटक्यामध्ये ८ हजाराहून अधिक घरे कोसळली होती. त्या दरम्यान भारताने भूकंपप्रभावित लोकांसाठी आपातकालीन मदत पाठवली होती. यात मेडिकल उपकरणे, महत्त्वाचे सामान आणि बरंच काही सामील होते.

२०१५मध्ये आला होता भूकंप

नेपाळच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात भयानक भूकंपाचे झटके २०१५मध्ये जाणवले होते. या दरम्यान ८ हजाराहून अधिक जणांचां मृत्यू झाला होता. तेव्हा भूकंपाची तीव्रता ७.८ आणि ८.१ इतकी होती. हे भूकंपाचे झटके २५ एप्रिल २०१५ला सकाळी स्थानिक वेळेनुसार ११ वाजून ५६ मिनिटांनी जाणवले.यावेळेस अनेक ऐतिहासिक मंदिरे तसेच इमारती पूर्णपणे कोसळल्या होत्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -