Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाVirat Kohli : क्रिकेटसोबतच कमाईमध्येही कोहली नंबर १, चौकार-षटकारांप्रमाणे वाढतेय संपत्ती

Virat Kohli : क्रिकेटसोबतच कमाईमध्येही कोहली नंबर १, चौकार-षटकारांप्रमाणे वाढतेय संपत्ती

मुंबई: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीने(virat kohli) क्रिकेटमध्ये अनेक जबरदस्त रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. क्रिकेटशिवाय कमाईच्या बाबतीत विराट अनेक खेळाडूंच्या खूप पुढे आहे. तुम्हाला माहीत आहे का विराट कोहली दरवर्षी क्रिकेट खेळत किती पैसा कमावतो? जाणून घ्या

क्रिकेटच्या मैदानासोबत विराट कोहली खाजगी आयुष्यातही अतिशय मस्तमजेदार पद्धतीने जगत असतो. विराट कोहलीकडे महागडी घरे, महागड्या गाड्या, लक्झरी घड्याळे तसेच अनेक गोष्टी आहे.

प्रॉपर्टीमध्ये मोठी गुंतवणूक

विराट कोहली क्रिकेटसोबतच इतर माध्यमातूनही जोरदार कमाई करत असतो. आयपीएल आणि जाहिरातीतून त्याची तगडी कमाई होत असते. त्याने प्रॉपर्टी, स्टार्टअप आणि रेस्टॉरंट बिझनेसमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. फायनान्शिअल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, त्याची साधारण संपत्ती १००० कोटींपेक्षा अधिक आहे.

विराट कोहलीच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी गुंतवणूक म्हणजे मुंबईतील त्याचे अलिशान घर आहे. ईटीच्या रिपोर्टनुसार कोहलीने २०१६मध्ये मुंबईत समुद्राच्या किनारी ७१७१ स्क्वे फुटाचे घर खरेदी केले होते. यासाठी त्याने तब्बल ३४ कोटी रूपये मोजले होते. ४ बेडरूमचे हे घर ३५व्या मजल्यावर आहे.

गुरुग्राममध्ये बंगला

विराट कोहली आणि अनुष्का शर्माने २०२२मध्ये ८ एकरावर पसरलेला बंगला खरेदी केला होता. याची किंमत १९ कोटी रूपये आहे. याशिवाय दोघांनी १३ कोटी रूपये किंमतीची आणखी एक प्रॉपर्टी विकत घेतली आहे. विराट कोहलीजवळ गुरूग्रामच्या डीएलएफ फेज १मध्ये १० हजार स्क्वे फुटाचा एक शानदार बंगला आहे. यात प्रायव्हेट स्विमिंगपूलसह अनेक सुविधा आहेत.

कार आणि घड्याळांचे शानदार कलेक्शन

विराट कोहलीकडे लक्झरी कार तसेच घड्याळांचे मोठे कलेक्शन आहे. यात हिरेजडित रोलेक्स डेटोना रेनबो एवरोज गोल्ड घड्याळाचा समावेश आहे. याची किंमत तब्बल ४.६ कोटी रूपये आहे. त्याच्याकडे आईस ब्लू डायल आणि ब्राऊन सिरॅमिक बेझलसह एक प्लॅटिनम रोलेक्स डेटोनाही आहे. याची किंमत १.२३ कोटी रूपये आहे.

विराट कोहली कारचाही शौकीन आहे. यासाठी त्याच्या कलेक्शनमध्ये एकापेक्षा एक सरस कार आहेत. यात ४० कोटींच्या बेंटले कॉन्टिनेंटल कारचाही समावेश आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -