Monday, May 13, 2024
HomeUncategorizedAjit Pawar : अजित पवार आजारी असल्याने दौंडमधील मोळीपूजन करणार कोण? राष्ट्रवादीने...

Ajit Pawar : अजित पवार आजारी असल्याने दौंडमधील मोळीपूजन करणार कोण? राष्ट्रवादीने घेतला ‘हा’ निर्णय

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोणत्याही शासकीय वा सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. यासंबंधी खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी ट्विट करत अजितदादांनी डेंग्यूची लागण झाली असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दौंडमधील आज होणार्‍या मोळीपूजनालाही ते उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे मोळीपूजनासाठी राष्ट्रवादीकडून (NCP) एक निर्णय घेण्यात आला आहे.

बारामतीतील दौंड तालुक्यातील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या अजित पवारांच्या खासगी मालकीच्या असलेल्या साखर कारखान्याचे मोळीपूजन आज होणार आहे. पण अजितदादांना डेंग्यूची लागण झाल्याने हे मोळीपूजन कोणाच्या हस्ते होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानुसार आता अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या हस्ते हे मोळीपूजन होणार आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) मराठा क्रांती मोर्चाचे (Maratha Kranti Morcha) कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना आणि पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक गावात पुढाऱ्यांना येण्यास विरोध केला जात आहे. अनेक ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत. त्यामुळे दौंडमध्ये मोळीपूजनासाठी अजितदादांनाही मराठा क्रांती मोर्चाकडून विरोध करण्यात आला. मराठे आणखी आक्रमक होऊ नयेत यासाठी देखील अजितदादा या पूजनाला जाणार नसल्याचे बोलले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -