Friday, May 17, 2024
Homeमहत्वाची बातमीAjit Pawar dignosed with dengue : अजित पवार नाराज नाहीत; तर त्यांना...

Ajit Pawar dignosed with dengue : अजित पवार नाराज नाहीत; तर त्यांना झाली आहे डेंग्यूची लागण

प्रफुल्ल पटेल यांची माहिती

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) कोणत्याही शासकीय वा सामाजिक कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. शिवाय काल पार पडलेल्या माळेगावातील मोळीपूजनालाही ते उपस्थित राहिले नव्हते. मराठा समाजाच्या आंदोलनाच्या (Maratha Samaj andolan) पार्श्वभूमीवर अजित पवार मुद्दाम जाण्याचे टाळत आहेत किंवा ते नाराज आहेत अशा चर्चांना यामुळे उधाण आले होते. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीचे कारण आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे अजित पवार यांना डेंग्यूची (Dengue) लागण झाल्याची माहिती दिली आहे. यामुळे सर्व नाराजींच्या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे.

प्रफुल्ल पटेल आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की, अजित पवारांना शनिवारी डेंग्यूचे निदान झाले आहे. डेंग्यूची लागण झाल्याने त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय उपचार व विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. अजित पवार नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहेत. एकदा ते पूर्णपणे बरे झाले की ते आपली समर्पित सार्वजनिक कर्तव्ये पुढे चालू ठेवण्यासाठी पूर्ण शक्तीने परत येतील, अशी पोस्ट प्रफुल्ल पटेल यांनी सोशल मीडियावर केली आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे, सांडपाण्यामुळे अनेक आजारांनी राज्याला विळखा घातला आहे. अनेक दिवसांपासून राज्यात डेंग्यूची साथही आली आहे. राज्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता डेंग्यू हा चिंतेचा विषय बनला आहे. याचाच फटका उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही बसला आहे. अजित पवारांची तब्येत अचानक बिघडल्याने चाचणी केली त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. अजित पवारांवर सध्या घरीच उपचार सुरु आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -