Wednesday, May 22, 2024
HomeदेशAjay Rai: मोदींविरोधात निवडणूक लढवणारे अजय राय यूपी काँग्रेसचे नवे अध्यक्ष

Ajay Rai: मोदींविरोधात निवडणूक लढवणारे अजय राय यूपी काँग्रेसचे नवे अध्यक्ष

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीआधी (loksabha election) उत्तर प्रदेशात (uttar pradesh) आता काँग्रेस (congress) अॅक्टिव्ह दिसत आहे. काँग्रेसचे माजी आमदार अजय राय(ajay rai) उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या(up congress committee) अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. काँग्रेस नेते अजय राय यांनी दोनदा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून लोकसभेची निवडणूक लढवली आहे. पहिल्यांदा २०१४ आणि त्यानंतर २०१९ मध्ये यांनी निवडणूक लढवली होती.

अजय रायने यूपी काँग्रेसमध्ये बृजलाल खाबरी यांची जागा घेतली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ८० जागा असलेला उत्तर प्रदेश देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मात्र सातत्याने निवडणूक हरणाऱ्या काँग्रेसची स्थिती या ठिकाणी खूप खराब आहे. २०१९मधील निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपली परंपरागत आणि सगळ्यात सुरक्षित मानली जाणारी अमेठीची जागाही गमावली होती. अशातच विखुरलेल्या संघटनेला एकत्र करणे आणि लोकसभा निवडणुकीआधी पार्टी कॅडर तयार करणे हे अजय राय यांच्याशी आव्हान असणार आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत यूपीमध्ये काँग्रेसला केवळ रायबरेली या जागेवर विजय मिळाला होता. सोनिया गांधी येथे खासदार आहेत. २०२२च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ दोनच जागा मिळाल्या होत्या.

कोण आहेत अजय राय

१९ ऑक्टोबर १९६९ला वाराणसीत जन्मलेले अजय राय पाच वेळा आमदार राहिले आहेत. १९९६मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते २००७मपर्यंत आमदार राहिले. यानंतर भाजमपधील मतभेदानंतर त्यांनी समाजवादी पक्ष जॉईन केला होता. २००९मध्ये त्यांनी मुरली मनोहर जोशी यांच्याविरोधात निवडणूक लढवली आणि ते हरले होते. त्यानतंर त्यांनी काँग्रेस पक्षाचा हात धरला. अजय राय यांच्याबाबत असे बोलले जाते की ते आपल्या जोरावर निवडणूक जिंकतात आणि पक्षाला याचा फायदा होतो. मात्र गेल्या काही निवडणुकीत त्यांना सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -