Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीRamayana Serial : अयोध्येत रामाच्या पुनरागमनानंतर आता रामायण मालिकेचंही होणार पुनरागमन

Ramayana Serial : अयोध्येत रामाच्या पुनरागमनानंतर आता रामायण मालिकेचंही होणार पुनरागमन

राम-सीता पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : यंदाच्या वर्षी हिंदूंच्या (Hindu) दृष्टीने २२ जानेवारी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस ठरला. अयोध्येत या दिवशी भव्य अशा राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ramlalla Pran Pratishtha) करण्यात आली. प्रभु श्री रामाचे या दिवशी पुनरागमन झाले. अशा या राममय वातावरणात रामभक्तांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. टीव्ही मनोरंजन क्षेत्रात (Television industry) सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका ‘रामायण’ (Ramayana Serial) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दूरदर्शन नॅशनलने (DD National) एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली.

रामानंद सागर यांची रामायण मालिका ही आतापर्यंत सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. २५ जानेवारी १९८७ ते ३१ जुलै १९८८ पर्यंत ही मालिका सुरु होती. ८२ टक्के प्रेक्षकांनी, दर्शकांनी ही मालिका पाहिल्याचे सांगण्यात येते. आतापर्यतचा रेकॉर्डब्रेक मिळालेला प्रतिसाद म्हणून त्याबाबत सांगितले जाते. कोरोना काळात देखील या मलिकेचे पुन्हा प्रक्षेपण करण्यात आले होते. तेव्हाही प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर ही मालिका पुन्हा दूरदर्शनवरुन प्रसारित केली जाणार आहे.

दूरदर्शन नॅशनलने केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, प्रभु श्रीराम हे पुन्हा आले आहेत. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय रामायण मालिका ही पुन्हा एकदा डीडी नॅशनलवर पाहता येणार आहे. केव्हापासून ही मालिका प्रदर्शित होणार याबाबत माहिती समोर आलेली नाही.

राम सीतेची लोकप्रियता कायम

२२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचे उद्घाटन अन् प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी रामायण मालिकेचे निर्माते आणि त्या मालिकेत काम केलेल्या कलाकारांना देखील यावेळी निमंत्रित करण्यात आले होते. त्यात उल्लेख करायचा झाल्यास अरुण गोविल, दीपिका चिखलिया, सुनील लहरी हे सहभागी झाले होते. रामायण मालिकेत रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल आणि सीतेच्या भूमिकेतील दीपिका चिखलिया यांची लोकप्रियता कायम आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -