Sunday, May 19, 2024
HomeUncategorizedSharad Mohol murder : शरद मोहोळच्या हत्येनंतर पत्नी स्वाती मोहोळ यांनी घेतली...

Sharad Mohol murder : शरद मोहोळच्या हत्येनंतर पत्नी स्वाती मोहोळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

काय केली मागणी?

पुणे : अत्यंत थरकाप उडवणार्‍या शरद मोहोळ हत्या प्रकरणात (Sharad Mohol murder case) त्याच्या साथीदारांनीच त्याला संपवल्याचे समोर आले. या प्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच ५ जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेची पुण्यात (Pune crime) एकच चर्चा सुरु आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी सहा आरोपींना १० जानेवारीपर्यंत आणि दोन वकिलांना ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ (Swati Mohol) यांनी या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. काल देवेंद्र फडणवीस पुण्यात आले असताना स्वाती मोहोळ त्यांना डीपी रोडवरील पुणे शहर भाजपाच्या नव्या कार्यालयाजवळ जाऊन भेटल्या. स्वाती मोहोळ या भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या पदाधिकारी देखील आहेत. स्वाती मोहोळ यांनी न्याय मिळावा, अशी मागणी फडणवीसांकडे केली. त्यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेबाबत तुम्हाला भेटून सविस्तर सांगायचे असल्याची भावना व्यक्त केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी होकार कळवत त्यासाठी तुम्हाला वेळ दिली जाईल असं आश्वासन दिलं.

शरद मोहोळ याचा त्याच्या लग्नाच्या वाढदिवशीच खून करण्यात आला होता. शरद मोहोळ याच्यासोबत काही दिवस साथीदार म्हणून काम कारणाऱ्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि इतर दोघांनी गोळीबार केला. साहिल मुन्ना यानं काही दिवस शरद मोहोळ याच्यावर पाळत ठेवली होती. आरोपींनी या गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल तीन महिन्यांपूर्वीच खरेदी केल्याची माहिती आहे. तर, साहिल पोळेकर गेल्या एक ते दीड महिन्यांपासून शरद मोहोळसोबत काम करत होता. साहिल पोळेकर यानं त्याचा मामा नामदेव कानगुडे याच्यासोबत दहा वर्षापूर्वी शरद मोहोळच्या झालेल्या वादाचा बदला घेतला.

दरम्यान, शरद मोहोळवर केलेला गोळीबार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -