Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीजमिनीनंतर आता आकाशातून रस्ते बनवणार गडकरी, खर्च १.२५ लाख कोटी, जगातील सर्वात...

जमिनीनंतर आता आकाशातून रस्ते बनवणार गडकरी, खर्च १.२५ लाख कोटी, जगातील सर्वात मोठा प्रोजेक्ट सुरू

नवी दिल्ली: रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी(nitin gadkari) यांचे आता पुढील लक्ष्य आभाळाकडे आहे. जमिनीवर रस्ते आणि एक्सप्रेवेचे जाळे विस्तारल्यानंतर आता त्यांचे पुढील ध्येय आकाशातून रस्ते निर्माण करण्यातवर आहे. अशा दुर्गम ठिकाणी जिथे रस्ते बांधणे कठीण असते आणि पायी जाणे अतिशय आव्हानात्मक आहे तेथे गडकरी यांनी हवाई मार्गाने जाणारा मार्ग शोधला आहे. यासाठी त्यांनी पुढील ५ वर्षांचा प्लान तयार केला आहे. यावर सव्वा लाख कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत.

गडकरी यांनी नॅशनल रोपवे डेव्हलपमेंट प्रोग्राम जे पर्वतरांगा परियोजनेचा भाग आहे याअंतर्गत देशभरात २०० रोपवे प्रोजेक्ट बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. पुढील ५ वर्षात या प्रोजेक्टवर काम केले जाणार आहे. या प्रोजेक्टवर साधारण १.२५ लाख कोटी रूपये खर्च येण्याचे अनुमान आहे. गडकरी पुढे म्हणाले, यासाठीच्या पैशांची व्यवस्था सरकारसोहत खाजगी कंपन्यांकडूनही केली जाणार आहे. ही योजना पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे.

शहरांसाठीही बनवले जाणार रोपवे

गडकरी यांचे म्हणणे आहे की रोपवे व्यवस्था केवळ डोंगराळ भागात पर्यटन व्यवस्था वाढवण्यास फायदेशीर ठरणार नाही. तर शहरी भागांतही हे दळणवळणाचे चांगले साधन बनू शकते. मला विश्वास आहे की रोपवे निर्मिती देशात पर्यटन वाढवण्यासोबतच नोकरी निर्मिती तसेच ट्रॅफिक सोपे बनवण्याचे मुख्य कारण बनू शकतात.

जगातील सर्वात मोठा प्रोजेक्ट

गडकरींनी सांगितले भारतात साधारण १२०० किमीचा रोपवे प्रोजेक्ट तयार केला जाईल. हा जगातील सर्वात मोठा रोपवे प्रोजेक्ट आहे. खरंतर, देशातील ३० टक्के भाग डोंगर आणि जंगलाने भरलेला आहे. येथे रस्ते आणि रेल्वे मार्ग विकसित करणेzdc आव्हानात्मक आहे. याचा पर्याय रोपवेच्या माध्यमातून पूर्ण केला जाऊ शकतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -