Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीEggs : अंडे उकडल्यानंतर किती वेळात खावे ? जाणून घ्या नाहीतर...

Eggs : अंडे उकडल्यानंतर किती वेळात खावे ? जाणून घ्या नाहीतर…

मुंबई: अंड्यामध्ये(egg) मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे तसेच प्रोटीन्स असतात. थंडी असो वा गर्मी अंडे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते.अंड्यांना व्यवस्थित स्टोर केले पाहिजे. मात्र आता असा सवाल आहे की उकडलेले अंडे तुम्ही किती वेळात खाल्ले पाहिेजे.

अनेकांना नाश्त्यात उकडलेली अंडी खायला आवडतात. काहीजण ऑम्लेट बनवून खातात. आज आम्ही तुम्हाला उकडलेल्या अंड्यांबद्दल सांगणार आहोत. उकडलेली अंडी किती वेळात खावीत. अंड्याला प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानले जाते. शरीराला फिट ठेवण्यासाठी दररोज अंडे खाणे फायदेशीर ठरते. जर तुम्हालाही उकडलेली अंडी खायला आवडत असतील तर जाणून घ्या ती किती वेळात खावीत.

उकडलेल्या अंड्यांचे फायदे

आरोग्यासाठी अंडे चांगले मानले जाते. यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. सोबतच यामुळे शरीराल एनर्जीही मिळते. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, आर्यन, व्हिटामिन ए, बी६, बी१२, फोलेट, अमिनो अॅसिड, फॉस्फरस आणि सेलेनयम इसेन्शियल अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्च असतात. उकडलेले अंडे हे प्रोटीनचा मोठा स्त्रोत मानला जातो. नाश्त्यापासून ते स्नॅक्सफर्यंत सर्वांना अंडे खायला आवडते.

उकडलेले अंडे किती वेळात खावे?

अंड्याला दीर्घकाळ फ्रेश ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवले जाते. आता असा सवाल आहे की उकडलेले अंडे किती वेळात खावे? तुमच्या माहितीसाठी उकडलेले अंडे तुम्ही ५-७ दिवस स्टोर करू शकता. जर तुम्ही अंडे नरम उकडलेत तर ते २ दिवसांच्या आत खावे. उकडताना अंड्याचे कवच तुटले तर ते २-३ दिवसांत खावे नाहीतर ते खराब होते.

असे स्टोर करा उकडलेले अंडे

अंडी उकडल्यानंतर ती थंड पाण्यात ठेवा. जेव्हा ती थंड होतील तेव्हा स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. त्याचे पाणी सुकल्यावर फ्रीजमध्ये ठेवा. अशा अंड्यांमध्ये बॅक्टेरिया होणार नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -