Monday, May 13, 2024
Homeदेशअभिनेत्री वरलक्ष्मी शरतकुमार कोरोनाग्रस्त

अभिनेत्री वरलक्ष्मी शरतकुमार कोरोनाग्रस्त

चेन्नई : सुविख्यात बहुभाषी अभिनेत्री, बहुमुखी कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्या वरलक्ष्मी शरतकुमार यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

या संदर्भात ट्वीटरद्वारे माहिती देत विशेष आवाहन करताना वरलक्ष्मी म्हणाल्या, “सर्व खबरदारी घेवूनही कोविड बाधित झाले आहे. कलाकार काम करताना मुखकवच घालू शकत नाही. जे व्यक्ती मला भेटले आहेत किंवा माझ्या संपर्कात आहेत त्यांनी कृपया लक्षणांकडे लक्ष द्या आणि तपासा. कृपया सावधगिरी बाळगा आणि मुखकवच घाला.. कोविड अजूनही आहे.”

अभिनेत्री वरलक्ष्मी जेष्ठ अभिनेत्री राधिका शरतकुमार आणि जेष्ठ बहुभाषी अभिनेते आर शरतकुमार यांच्या कन्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -