Saturday, May 18, 2024
Homeताज्या घडामोडीतीन महिने 'फ्री' मध्ये होणार 'आधार अपडेट'

तीन महिने ‘फ्री’ मध्ये होणार ‘आधार अपडेट’

नवी दिल्ली : ऑनलाइन आधार कार्ड अपडेट करणा-यांना पुढील तीन महिन्यांपर्यंत ऑनलाइन आधार अपडेट करताना आता कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. याआधी यासाठी ५० रुपये चार्ज आकारला जात होता. परंतु, आता आधार कार्ड अपडेट फ्री मध्ये होणार आहे. ऑफलाइन किंवा केंद्रावर जावून तुम्ही आधार कार्ड अपडेट करू शकता.

आधार कार्ड अपडेटसाठी ५० रुपये चार्ज आकारले जात होते. परंतु, आता १४ जून २०२३ पर्यंत हे फ्रीमध्ये करता येणार आहे. याचाच अर्थ १४ जून २०२३ पर्यंत या अपडेटसाठी कोणतेही चार्ज लागणार नाही.

आधार कार्ड जारी होवून जवळपास १० वर्षे झाली आहेत. या दरम्यान अनेक लोकांचा पत्ता, नाव बदलले आहेत. त्यामुळे सुरक्षेचे कारण पाहून UIDAI कडून सर्व आधार कार्डला अपडेट करण्याचा सल्ला दिला गेला आहे. आधार अपडेट ऑनलाइन वेग आणखी वेगवान करण्यासाठी मोदी सरकारकडून ५० रुपये फी तात्पुरती थांबवली आहे.

कसे कराल ऑनलाइन आधार अपडेट

स्टेप १ : सर्वात आधी MyAadhaar portal वर जा, या ठिकाणी Update your Address Online वर क्लिक करावे लागणार आहे.

स्टेप २ : यानंतर Proceed to Update Address वर क्लिक करावे लागणार आहे.

स्टेप ३ : पुन्हा एक नवी विंडो ओपन होईल. ज्यात तुम्हाला १२ डिजिटचा आधार नंबर टाकावा लागेल. पुन्हा Send OTP वर क्लिक करावे लागणार आहे.

स्टेप ४ : या नंतर तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर ओटीपी पाठवला जाईल. याला व्हेरिफाय करावे लागेल.

स्टेप ५ : यानंतर पत्ता प्रूफला अपलोड करून सबमिट करावे लागेल.

स्टेप ६ : यानंतर तुमचे आधार अपडेट होईल. तसेच १४ डिजिटचे URN जनरेट होईल. या URN च्या मदतीने आधार अपडेट स्टेट्सचा पत्ता लावून त्याला डाउनलोड करता येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -