Friday, May 17, 2024
HomeदेशAadhaar card : मोफत अपडेटची मुदत पुन्हा वाढवली

Aadhaar card : मोफत अपडेटची मुदत पुन्हा वाढवली

नवी दिल्ली : मोदी सरकारने आधार कार्ड (Aadhaar card) फ्री आधार सविस्तर अपडेट करण्याची मुदत १४ मार्चहून १४ जून, २०२४ रोजीपर्यंत वाढवली आहे. यामुळे आता देशातील कोट्यवधी लोकांना ४ महिन्यांचा कालावधी वाढवून मिळाला आहे. समाज माध्यम एक्स वर यूआयडीएआयने याविषयीची पोस्ट केली आहे.

यूआयडीएआयने लाखो आधार कार्डधारकांना लाभ मिळण्यासाठी फ्री ऑनलाइन कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा दि. १४ जून २०२४ रोजीपर्यंत वाढवली आहे. ही मोफत सेवा केवळ myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. जर तुमचे आधार कार्ड १० वर्षांपेक्षा अधिक जुने असेल आणि अजून ते अपडेट केलेले नसेल, तर ही संधी उपलब्ध झाली आहे.

या निर्णयामुळे नागरिकांना कागदपत्रांआधारे myAadhaar पोर्टल https://myaadhaar.uidai.gov.in/ च्या माध्यमातून दि. १४ जूनपर्यंत मोफत बदल करता येणार आहे. आधार कार्डमधील हा बदल केवळ ऑनलाइन अपडेशनसाठी आहे, पण तुम्ही आधार केंद्रावर जाऊन कागदपत्रांआधारे आधार कार्डमध्ये बदल कराल तर त्यासाठी २५ रुपये शुल्क अदा करावे लागेल.

आधार कार्ड हा अत्यंत आवश्यक पुरावा मानण्यात येतो. अनेक सरकारी आणि गैरसरकारी कामासाठी आधार कार्ड दाखवावे लागते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेळोवेळी आधार कार्ड अपडेटविषयी निर्देश देते. सध्या आधार कार्डला १० वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झाला असेल, तर आधार कार्डमध्ये अपडेट मोफत करता येते.

असे करा आधार कार्ड अपडेट

UIDAI च्या https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा अथवा https://ssup.uidai.gov.in/ssup/ यावर लॉगिन करा. १२ अंकांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन व्हा. ओटीपीचा पर्याय निवडा, पुढील प्रक्रिया करा. आधार संबंधित मोबाइल क्रमांकावर हा ओटीपी येईल. ओटीपी टाकून ‘अपडेट आधार ऑनलाइन’ हा पर्याय निवडा. ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ हा पर्याय निवडा, माहिती भरा. ऑफलाईन असे अपडेट करा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -