Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणकणकवली शहरात वाहणार बारमाही धबधबा

कणकवली शहरात वाहणार बारमाही धबधबा

पालकमंत्री रविंद्र चव्हाण,आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून मिळाला निधी

कणकवली शहरासाठी राज्य शासनाचा १३ कोटीचा निधी मंजूर

कणकवली : कणकवली शहरातील प्रलंबित राहिलेल्या विकास कामांसाठी राज्य सरकारने दहा कोटी रूपये तसेच पर्यटनास चालना मिळण्यासाठी गणपती साना येथे बारमाही वाहणाऱ्या धबधब्यासाठी निर्मितीसाठी २ कोटी ६० लाख २३ हजार रूपये असा १३ कोटीचा निधी मंजूर केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून हा निधी प्राप्त झाला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी अभावी रखडलेली विकासकामे आता एकनाथ शिंदे व फडणवीस सरकारने निधी दिल्याने वेगाने पुर्णत्वास जाणार आहेत,अशी माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.

नगराध्यक्षांच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत समिर नलावडे व बंडू हर्णे बोलत होते.समिर नलावडे पुढे म्हणाले, जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर म्हणून कणकवली विकसीत होत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नाने,आशिर्वादाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री रविंद्र चव्हाण व आपले लोकप्रिय आमदार नितेश राणे या सर्वांच्या प्रयत्नामुळे कणकवली शहराला एक दिशा मिळत आहे.त्याबद्द्ल त्या सर्वांचे त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर कणकवली नगर पंचायतीला बंपर निधी मिळणार असल्याचे दोन महिन्यापूर्वी बोललो होतो .तो बंपर निधी मिळाला आहे. कणकवली सारख्या छोट्या नगरपंचायतील एवढा निधी इतक्या सहज लवकर मिळणे हे राज्यातील दुर्मिळ उदाहरण असावे असे नलावडे यांनी सांगितले .आणखी १० कोटीचा निधी मिळणार आहे असा निधी मिळत राहिला तर माझ्या व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या डोक्यात शहर विकासाच्या कित्येक योजना आहेत त्या मार्गी लावता येतील असे नलावडे यांनी यावेळी सांगितले.

नगरपंचायत कक्षेत नागरी सेवा सुविधा अंतर्गत राज्याने कणकवली शहर विकासकामासाठी १० कोटीचा तर गणपती साना येथे जल स्त्रोतांचे साैदरीकरण करण्यासाठी २ कोटी ६० लाख रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला.

शहरातील विकासकामांसाठी मंजूर झालेल्या निधीची माहिती बंडू हर्णे यांनी यावेळी दिली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नगर, रेवडेकर घर ते वरूणकर घर व चाफेकर घर पाणंद नुतनीकरण करणे, परशुराम अपार्टमेंट ते दत्तकृपा अपार्टमेंट पर्यंत गटार बांधकाम करणे, फौजदारवाडी येथील रवळनाथ मंदिर ते राणे घर पाणंदी व पेव्हर ब्लॉक बसविणे व संरक्षण भिंत बांधकाम करणे, पटकीदेवी ते भालचंद्र महाराज आश्रम कॉंक्रीट गटार बांधकाम करणे, जुना नरडवे रस्ता ते पिळणकर वाडी रस्ता व पोल शिप्टींग करणे, रिंग रोड फेज १ रस्त्याचे डांबरीकरण व उर्वरित आर सी सी गटार बांधकाम करणे अशी ३८ काम मंजूर करण्यात आल्याचे माहिती बंडू हर्णे यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -