Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीChina Landslide : चीनमध्ये भूस्खलनाची मोठी दुर्घटना; १८ घरे जमिनीखाली!

China Landslide : चीनमध्ये भूस्खलनाची मोठी दुर्घटना; १८ घरे जमिनीखाली!

४० हून अधिक लोक बेपत्ता

युनान : चीनमध्ये (China) भूस्खलन (Landslide) होऊन मोठी दुर्घटना घडली आहे. चीनच्या युनान प्रांतात (Yunnan Province) भूस्खलनामुळे (Landslide Updates) सुमारे ४० हून अधिक लोक गाडले गेले आहेत. चीनच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एकूण ४७ लोक गाडले गेले आहेत. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी ३३ अग्निशमन वाहने आणि १० लोडिंग मशीनसह २०० हून अधिक बचाव पथकातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

चिनी मीडिया रिपोर्टनुसार, युनान प्रांतात सोमवारी सुमारे १८ घरे गाडली गेली असून अनेक जण बेपत्ता आहेत. तर, २०० हून अधिक लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु असून २०० हून अधिक कर्मचाऱ्यांसह विविध उपकरणे घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत.

चीनमधील युनान या दुर्गम भागात भूस्खलन होणे सामान्य आहे जेथे हिमालयाच्या पठारावर उंच पर्वतरांगा आहेत. आज युनानमधील डोंगरांनी वेढलेल्या ग्रामीण भागात भूस्खलनाची दुर्घटना घडली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -