Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीमुसळगाव औद्योगिक वसाहतीतील कंपनीला भीषण आग

मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील कंपनीला भीषण आग

सिन्नर : सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहत मुसळगाव येथील केमिकल असलेल्या आदिमा ऑरगॅनिक या केमिकल कंपनीला शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास आकाशात आगीचे लोळ सर्व दूर दिसत असल्याने नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली.आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

स्फोटाचे आवाजही येत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. या कंपनीच्या बाहेर सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकर्ण आवारे व्यवस्थापक कमलाकर पोटे तसेच मुसळगाव एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर हे तळ ठोकून आहेत. अग्निशामक बंब यांना पाचरण करण्यात आलेले असून आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न अग्निशामक जवान करीत आहे.

आग कशामुळे लागली याचे कारण अजून स्पष्ट झाले नसून आग कशी लवकरात लवकर विझवता येईल, यासाठी सर्वजण प्रयत्न करीत होते. सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे सर्व कर्मचारी तसेच सिन्नर नगर परिषदेचे अग्निशामक नाशिक येथील अग्निशामक बंब व माळेगाव येथील अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झालेले असून आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आग अतिशय भीषण असल्याने आगीचे लोळ अनेक किलोमीटरवर दिसत आहे. कंपनीत पंधरा ते वीस कामगार काम करीत होते, पण आग लागण्याच्या अगोदरच ते बाहेर आलेले असल्याने मोठा अनर्थ टळला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -