Wednesday, May 22, 2024
Homeताज्या घडामोडीजन्मजात ह्रदयविकार असलेल्या १४ वर्षांच्या येमेनी मुलावर नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वी...

जन्मजात ह्रदयविकार असलेल्या १४ वर्षांच्या येमेनी मुलावर नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार

नवी मुंबई(प्रतिनिधी): डॉ. अभय जैन, कार्डियाक सर्जन, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांच्या नेतृत्वाखालील टीमने जन्मजात हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या येमेनमधील एका १४ वर्षीय मुलाला नवीन आयुष्य मिळवून दिले. जन्मतःच रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्वचा, ओठ किंवा नखे निळे पडणे, थकवा आणि सायनोसिस यासारखी लक्षणे आढळून येत होती.या रुग्णाच्या ऱ्हदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर लगेच, रुग्णाचे ऑक्सीजन सॅच्युरेशन 75% वरून 100% पर्यंत सुधारली. त्याला 3 दिवस आयसीयूमध्ये आणि 2 दिवस निरक्षणाखाली ठेवण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर, जेव्हा त्याला त्याच्या आईने पहिल्यांना पाहिले तेव्हा तिला रडू आवरता आले नाही. निळसर त्वचेमुळे त्याचा मूळ रंग पहायलाच मिळत नव्हता मात्र यशस्वी उपचाराने आता त्याची त्वचा सामान्य त्वचेप्रमाणे दिसू लागली आहे.

रुग्ण युसेफ सालेह अवध महदी या मुलाला थकवा आणि सायनोसिस यासारख्या तक्रारी होत्या. त्याची त्वचा, ओठ किंवा नखे जन्मत:च रक्तात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे निळे पडत होती. तो जन्मापासूनच वैद्यकीय व्यवस्थापनावर अवलंबून होता आणि त्याच्यावरील अंतिम उपचार म्हणजे शस्त्रक्रिया. वयानुसार श्वासोच्छवास आणि सायनोसिस वाढत गेल्याने त्यांची तब्येत आणखी खालावत गेली. रुग्णाने डॉक्टर अभय जैन यांचा सल्ला घेतला आला आणि शस्त्रक्रियेच्या १५ दिवसांपूर्वी मेडिकवर रुग्णालयात दाखल झाला.

डॉ. अभय जैन(कार्डियाक सर्जन, मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई) सांगतात की, बाळाला दम लागणे, थकवा येणे आणि त्वचा निळी पडणे (बोटे,नखं आणि ओठ) तसेच ऑक्सीजन सॅच्युरेशन 75% असलेला रुग्ण उपचाराकरिता दाखल झाला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची २ डी इको चाचणी करण्यात आली. बाळाला टेट्रालॉजी ऑफ फॅलोट (टीओएफ) , ब्लू बेबी सिंड्रोम असल्याचे आढळून आले ज्यामुळे फुफ्फुसात रक्त प्रवाह कमी झाला होता. हा दुर्मिळ जन्मजात ह्रदयाचा आजार जगात जन्मलेल्य 1000 जिवंत बाळांपैकी 0.34% बाळांमध्ये आढळतो. हा आजार असलेल्या व्यक्तीच्या हृदयात छिद्र पडल्यामुळे ऑक्सिजनयुक्त आणि डीऑक्सीजनयुक्त रक्ताचे मिश्रण होते. त्याच्या शरीरात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असल्याने त्याचे शरीर निळे पडले. यशस्वी प्रक्रियेने आधी फुफ्फुसातील रक्त प्रवाह सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासाठी 8 तासांची दुर्मिंल शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्वचेचा निळसरपणा, थकवा आणि श्वासोच्छवासाची लक्षणे दूर झाली आहेत. रुग्ण पुढील 3 दिवस आयसीयूमध्ये होता. 7 मार्च रोजी त्याला घरी सोडण्यात आले. त्यांची तब्येत बरी झाली आहे आणि आता तो लवकरच शाळेत जाण्यास सुरुवात करेल. त्याच्यावर योग्य वेळी उपचार न केल्याने कमी SPO2, न्यूरोलॉजिकल समस्या आणि शेवटी मृत्यू होऊ शकतो.

वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मेडिकवर हॉस्पीचलने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. हे प्रकरण सुरुवातीपासूनच गुंतागुंतीचे आणि आव्हानात्मक होते.मात्र या आव्हानांना यशस्वीपणे पेलत या रुग्णाला नवे आयुष्य मिळवून दिल्याची माहिती डॉ माताप्रसाद गुप्ता(केंद्र प्रमुख, मेडिकोव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई) यांनी स्पष्ट केले.

आमच्या मुलाला 14 वर्षांपासून सतत थकवा आणि त्वचा निळी पडणे यासारखी समस्यांशी झगडताना पाहून आम्हांला वाईट वाटायचे. आमच्या मुलाच्या आरोग्याविषयी आम्हाला सतत चिंता वाटायची. लाजिरवाणेपणा आणि इतरांकडून थट्टा होईल या भीतीने तो शाळेत किंवा कोणत्याही सामाजिक कार्यक्रमाला जाणे टाळत असे. मेडीकवर हॉस्पिटलमध्ये वेळीच उपचार मिळाल्याने आज माझ्या मुलाचे प्राण वाचले असून संपुर्ण डॉक्टरांच्या टीमचे आभार मानतो. 14 वर्षे यातना काढल्यानतंर, माझे मूल आता सामान्य जीवन जगू शकेल ज्याचे आम्ही नेहमी स्वप्न पाहिले होते. दम न लागता आता तो आता खेळू शकतो किंवा त्याच्या आवडीच्या क्रिया करू शकतो अशी प्रतिक्रिय रुग्णाच्या वडिलांनी व्यक्त केली

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -