साप्ताहिक राशिभविष्य, ६ ते १२ एप्रिल २०२५
![]() |
नवीन नवीन मोठ्या संधी प्राप्त होतीलमेष : या आठवड्यात आपल्याला भावनेच्या आहारी न जाता कर्तव्याला प्राधान्य देणे हिताचे ठरेल. नोकरी आणि व्यावसायिक क्षेत्रात कामाची व्याप्ती वाढल्यामुळे जास्तीची कामे करावी लागण्याची शक्यता. कोणत्याही प्रकारचा ताणतणाव न घेता आपले काम करण्याच्या प्रयत्नात कमी पडू देऊ नका. नोकरीतील राजकारण आणि गटबाजी यापासून मनस्ताप होण्याची शक्यता. जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. आपल्या कामावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. व्यवसायामध्ये अचानक उद्भवलेल्या काही समस्या व्यवसायावर परिणाम करू शकतात. चर्चेद्वारे समस्यांचे निवारण करता येईल. नवीन नवीन मोठ्या संधी प्राप्त होतील. |
![]() |
अधिकारांमध्ये वृद्धी होऊ शकतेवृषभ : सप्ताह पूर्वार्धमध्ये आपल्याला थोडा संयम बाळगावा लागणार आहे. आपल्या मनाप्रमाणे कार्य होतीलच असे नाही लगेच नाराज होण्याची गरज नाही. आपले प्रयत्न चालू ठेवणे महत्त्वाचे ठरेल. खर्चामध्ये वाढ होईल; परंतु ते खर्च काही चांगल्या कामासाठी होणार आहेत. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक यश मिळू शकते. काहींना शिष्यवृत्तीसह परदेशगमनाचे योग. सामाजिक तसेच धार्मिक कार्यात रस घ्याल. सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वृद्धी होऊन सामाजिक स्तर उंचावेल. काही सभा समारंभ आपल्या उपस्थित होतील. मानाचे स्थान मिळू शकते. लोकसंग्रह वाढेल. आपल्या कार्याची प्रशंसा होईल. नोकरीमध्ये अनुकूल परिस्थिती राहील. |
![]() |
व्यवहार गतिशील होतीलमिथुन : व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहून व्यवसायात केलेले नवीन बदल व्यवसायासाठी पोषक ठरतील. व्यवसाय विस्ताराच्या योजना सफल होतील. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील मात्र उधार उसनवारी टाळा. त्याचप्रमाणे जुगार सदृश व्यवहार करू नका. जास्त प्रमाणात जोखीम असलेली कार्य टाळणे हितकारक ठरेल. सरकारी कामांमध्ये कटकटी निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे विलंब लागून खर्चही होण्याची शक्यता आहे. वाहने सावधानतेने चालवा. तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहील. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. दीर्घकालीन रखडलेले मालमत्तेचे व्यवहार गतिशील होतील. |
![]() |
प्रयत्नांना यश मिळेलकर्क : कोणतेही लहान-मोठे व्यवहार करताना सावधानता बाळगणे गरजेचे ठरेल. त्याचप्रमाणे नव्या गुंतवणुका करताना त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला उपयोगी पडू शकतो. फसवणुकीची शक्यता अथवा नुकसान. शांतपणे निर्णय घेणे गरजेचे. घाईगर्दीत घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरू शकतात. व्यवसाय धंद्यात वातावरण जरी सर्वसामान्य असले तरी अचानक काही समस्या उद्भवू शकतात. विशेषतः भागीदारी व्यवसायात. भागीदाराबरोबर वाद-विवाद घडून तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. |
![]() |
सामाजिक मानसन्मानसिंह : अनुकूल असे ग्रहमान आपल्याला चांगली फळे देईल. खासगी अथवा सरकारी नोकरीमध्ये पती अथवा पत्नीचा भाग्योदय. पूर्वी केलेल्या कामाचे अपेक्षित फळ मिळेल. पदोन्नती अथवा वेतनवृद्धी सारख्या घटना घडू शकतात मात्र बदलीची शक्यता आहे. कामाच्या स्वरूपात बदल होऊन स्थलांतर होऊ शकते. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवणे क्रमप्राप्त ठरेल. सामाजिक मानसन्मान मिळून एखाद्या कार्यक्रमात मानाचे स्थान मिळेल. समाजातील व्यक्तींच्या मार्गदर्शनासह मदत मिळू शकते. |
![]() |
प्रवास कार्य सिद्ध राहतीलकन्या : संमिश्र स्वरूपाचा ग्रह परिस्थितीमुळे कधी कडू, तर कधी गोड स्वरूपाचे अनुभव येऊ शकतात. शांतपणे तसेच पूर्ण विचारांती निर्णय घेणे गरजेचे ठरेल. घरातील मुला-मुलींचे प्रश्न सुटतील; परंतु लहान मुलांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवा. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे क्रमप्राप्त ठरेल. वैवाहिक जीवनात सुवार्ता मिळतील. सहकुटुंब, सहपरिवार प्रवासाचे योग आहेत. प्रवास कार्य सिद्ध राहतील. कुटुंबातील वातावरण उत्साही राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळत राहील. |
![]() |
सकारात्मक राहणे गरजेचे ठरेलतूळ : सध्याचा कालावधी यशदायी ठरेल. हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात मनाप्रमाणे यश मिळणार आहे मात्र आपल्या कार्यक्षेत्रात आपण सकारात्मक राहणे गरजेचे ठरेल. इतरांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून त्यावर प्रतिक्रिया द्या, फायद्यात राहाल. शत्रू, हितशत्रू अथवा विरोधक यांच्या कारवाया वाढल्या तरी त्यांच्यावर विजय प्राप्त करू शकाल. कुटुंब परिवार तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळातील मतभेदांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने मनस्ताप होणार नाही. लहान-सहान गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. तरुण-तरुणींचे प्रश्न संपतील. प्रेमात यश मिळू शकते. |
![]() |
यश प्राप्त होईलवृश्चिक : आपल्या कार्यक्षेत्रात केलेले नियोजन सफल होताना अनुभवता येईल. केलेल्या कष्टाचे फळ मिळू शकेल. मात्र सरकारी प्रकरणातून त्रास संभवतो. सरकारी नियम पाळा. तसेच सरकारी स्वरूपाच्या कामात विलंब लागू शकतो. तसाच खर्च येऊ शकतो. शांत डोक्याने आपले पुढील कार्य करत राहा. सामाजिक जीवनात शत्रू व हितशत्रूंपासून मनस्तापाची शक्यता. विद्यार्थ्यांना दिलेल्या परीक्षेत यश प्राप्त होईल. आपल्या कार्यक्षेत्रात तसेच कुटुंब परिवारात व मित्रमंडळींच्या वर्तुळात वाद-विवाद करणे टाळा. खर्चामध्ये वाढ होईल. |
![]() |
कार्यविस्तार होईल
|
![]() |
कामात काही बदल करावे लागतीलमकर : दैनंदिन कामात काही बदल करावे लागतील. आयत्या वेळेस नवीन कामे उद्भवल्याने धावपळ होईल. सावध राहून कार्य पूर्ण करा. एकाच वेळेस अनेक कामे करण्याचा प्रयत्न अंगाशी येऊ शकतो. वाहने सावकाश चालवा. आर्थिक व्यवहार सावधानतेने करण्याची गरज नुकसानीची शक्यता. महत्त्वाची कागदपत्रे, मौल्यवान वस्तू, वाहने सुरक्षित ठेवणे गरजेचे ठरेल. चोरीची अथवा गहाळ होण्याची शक्यता. जुने वाहन बदलून नवीन वाहन खरेदी करता येईल. कुटुंब परिवारात लहान-सहान कारणांवरून वाद-विवाद संभवतात. कुटुंबातील सदस्यांबरोबर समन्वय साधने गरजेचे ठरेल. आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील. |
![]() |
मन:स्वास्थ्य सांभाळाकुंभ : एखाद्या अप्रिय घटनेचा परिणाम कार्यतत्परतेवरती होणार नाही याची काळजी घ्या. नाराज होऊ नका. मन:स्वास्थ्य सांभाळा. छोट्याशा कामाला जास्त वेळ लागला तरी विचलित होऊ नका. खर्चाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता. कार्यक्षेत्रात मनाविरुद्ध निर्णय घ्यावे लागण्याची शक्यता आहे; परंतु आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करून कार्यमग्न राहणे गरजेचे ठरेल. सर्वत्र नियोजनाला महत्त्व राहील. नियोजनाला प्राधान्य दिल्यास येणाऱ्या समस्या टाळता येतील. नोकरीमध्ये वरिष्ठांचा विश्वास तसेच त्यांची मर्जी सांभाळण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. गटबाजी आणि राजकारणापासून अलिप्त राहा. जमीन, मालमत्ता संबंधित व्यवहार पुढे ढकला. |
![]() |
चिंतामुक्त राहालमीन : अचानक काही खर्च समोर उभे राहिल्याने नियोजनात बदल करावे लागतील. खर्चाचे प्रमाण वाढल्यासारखे दिसेल. व्यवसाय-धंद्यात आर्थिक मदतीची गरज भासू शकते. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. मित्रमंडळींच्या वर्तुळातून अथवा ओळखीतून ही आर्थिक मदत मिळू शकते. कुटुंब परिवारातून ज्येष्ठ व्यक्तींकडून सहाय्य मिळेल. चिंतामुक्त राहाल. समस्या जरी आल्या तरी त्या सुटतील. प्रयत्नशील राहून कार्यमग्न राहा. कुटुंबामध्ये धार्मिक अथवा मांगलिक कार्य घडण्याची शक्यता. एखाद्या कार्यक्रमाचे नियोजन होईल. नोकरीमध्ये पती अथवा पत्नीचा भाग्योदय होऊ शकतो. अचानक पदोन्नती अथवा वेतन वृद्धी मिळेल. |