Saturday, April 19, 2025
Homeक्रीडाICC Champions Trophy 2025: २५ वर्षांपूर्वी भारत-न्यूझीलंड यांच्यात रंगला होता चॅम्पियन्स ट्रॉफीचा...

ICC Champions Trophy 2025: २५ वर्षांपूर्वी भारत-न्यूझीलंड यांच्यात रंगला होता चॅम्पियन्स ट्रॉफीचा फायनल सामना, किवी संघाने मारली होती बाजी

मुंबई: २००० या सालानंतर पहिल्यांदा भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी(ICC Champions Trophy 2025) स्पर्धेचा फायनल सामना रंगत आहे. दोन्ही संघादरम्यान ९ मार्चला दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सामना रंगणार आहे. जेव्हा दोन्ही संघ शेवटचे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आमनेसामने आले होते तेव्हा टीम इंडियाला हरवत किवी संघाने खिताब जिंकला होता.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५सेमीफायनलमध्ये(ICC Champions Trophy 2025) टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला तर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला हरवत फायनलमध्ये जागा मिळवली. भारत आणि न्यूझीलंड एकाच ग्रुपमध्ये सामील होते. ग्रुप स्टेजमधील सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला ४४ धावांनी हरवले होते.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०००च्या फायनलमध्ये आमनेसामने होते भारत आणि न्यूझीलंड

चॅम्पियन्स ट्रॉफीचा(ICC Champions Trophy 2025) दुसरा हंगाम २०००मध्ये केनियामध्ये आयोजित करण्यात आला होता. यात न्यूझीलंड संघाने विजय मिळवला होता. किवी संघ भारताला फायनलमध्ये हरवत चॅम्पियन बनले होते. येथे भारतीय संघाचा कर्णधार सौरव गांगुली होता तर प्लेईंग ११मध्ये सचिन तेंडुलकर, युवराज सिंह, राहुल द्रविड, अजित आगरकर, अनिल कुंबळे, झहीर खान यासारखे खेळाडू होते.

तेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २६४ धावांचा स्कोर केला होता. कर्णधार गांगुलीने ११७ धावांची शानदार खेळी केली होती. सचिन तेंडुलकरने ६९ धावा केल्या होत्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी केली होती. दरम्यान, इतर फलंदाज चांगली खेळी करू शकले नाही. या आव्हानाचा पाठलाग करताना किवी संघातील क्रिस केर्न्सने १०२ धावा तडकावल्या होत्या. न्यूझीलंडने २ बॉल आणि ४ विकेट राखत आव्हान गाठले होते.

आता २५ वर्षांनी या पराभवाचा बदला घेण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. त्यामुळे या फायनल सामन्यात भारतीय संघ किवी संघाला हरवत जेतेपद मिळवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल. दरम्यान, यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताच्या कामगिरीवर नजर टाकल्यास न्यूझीलंडसमोर त्यांचे पारडे जड वाटते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -