मुंबई: शेअर बाजारमध्ये मोठी घसरण झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे असे मार्ग निवडले आहेत ज्यात जोखीम नसते. सुरक्षित गुंतवणूक आणि रिटर्न्सच्या बाबतीत फिक्स डिपॉझिट स्कीम्स खूप प्रसिद्ध आहेत. जर तुम्हाला एफडीमध्ये गुंतवणूक करायची आहे तर आम्ही तुम्हाला अशा एफडीबद्दल सांगणार आहोत ज्यात शानदार व्याज मिळत आहे.
खास बाब म्हणजे या स्कीम्समध्ये पैसे गुंतवण्यासाठी तसेच त्यांचा फायदा घेण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. याची डेडलाईन ३१ मार्च २०२५ आहे. या यादीत पहिल्या स्थानावर एसबीआय बँकची अमृत वृष्टी आहे. यात ४४४ दिवसांसाठी गुंतवणूक करावी लागेल आणि ७.२५ टक्के व्याज मिळेल. तर वरिष्ठ नागरिकांसाठी ७.७५ टक्के दिले जात आहे.
दुसऱ्या ४०० दिवसांच्या गुंतवणुकीची अमृत कलश योजना आहे. यात सामान्य लोकांसाठी ७.१० टक्के आणि वरिष्ठ नागरिकांसाठी ७.६० टक्के व्याज मिळत आहे.
IDBI बँकची स्पेशल उत्सव कॉलबेल एफडी ३०० दिवसांची आहे. यात सामान्य नागरिकांना ७.०५ टक्के आणि वरिष्ठ नागरिकांना ७.५५ टक्के व्याज ऑफर करत आहे.
चौथ्या नंबरवर आयडीबीआय बँक ची ही स्कीम आहे. ही ७०० दिवसांची आहे आणि यात सामान्य नागरिकांना आणि वरिष्ठ नागरिकांना व्याज अनुक्रमे ७.२० टक्के आणि ७.७० टक्के आहे.
इंडियन बँकेची सुप्रीम ३०० दिवसांची एफडी स्कीम आहे. याची डेडलाईन ३१ मार्चपर्यंत आहे. यात वरिष्ठ नागरिक गुंतवणूकदारांना ८ टक्क्यांपेक्षा अधिक व्याज मिळत आहे.