नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठात हिंदू धर्मावर पीएच डी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या संदर्भात सेंटर फॉर हिंदू स्टडिज या विभागाने दिल्ली विद्यापीठाच्या प्रशासनापुढे एक प्रस्ताव ठेवला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर नव्या शैक्षणिक वर्षापासून दिल्ली विद्यापीठात हिंदू धर्मावर पीएच डी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. दिल्ली विद्यापीठाने मंजुरी दिली तर नव्या शैक्षणिक वर्षात जास्तीत जास्त दहा विद्यार्थ्यांना हिंदू धर्मावर पीएच डी करण्याची संधी होईल. विद्यापीठ प्रशासनाच्या मंजुरीनंतर हिंदू धर्मावरील पीएच डी अभ्यासक्रमाबाबतची माहिती दिल्ली विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. वेबसाईटवरील अभ्यासक्रमाच्या माहितीसोबतच या पीएच डी साठीचे पात्रता निकष दिल्ली विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले जातील.
IND vs AUS : सामना सुरु असतानाच सुरक्षा तोडून चाहता घुसला मैदानात अन् विराटसोबत केला डान्स!
सेंटर फॉर हिंदू स्टडिज या विभागाच्या प्रस्तावानुसार दिल्ली विद्यापीठातून हिंदू धर्मावर पीएच डी करण्यासाठी JRF/NET पात्रतेसह हिंदू धर्माशी संबंधित अभ्यासक्रमात किमान ५५ टक्के गुणांसह मास्टर्सची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्याला दिल्ली विद्यापीठाची पीएच डी पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. आरक्षण श्रेणीतील विद्यार्थ्याने हिंदू धर्मावर पीएच डी करण्यासाठी अर्ज केला तर त्याला पात्रतेच्या निकषात नियमाआधारे सवलत दिली जाईल. याबाबतची सविस्तर माहिती दिल्ली विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवरून दिली जाईल.
बघा : मुळ्याची पाने आरोग्यासाठी लाभदायी ?
अभ्यासक्रमाला मिळणाऱ्या प्रतिसादाचा आढावा घेऊन हिंदू धर्मावरील पीएच डी साठीच्या जागा वाढवण्याबाबतचा प्रस्ताव दिल्ली विद्यापीठाच्या प्रशासनापुढे ठेवू, असे सेंटर फॉर हिंदू स्टडिज या विभागाने सांगितले.