Wednesday, April 23, 2025
Homeक्रीडाIND vs BAN: अश्विनचे शतक, जडेजाची दमदार खेळी, पहिल्या दिवसअखेर भारत तीनशेपार

IND vs BAN: अश्विनचे शतक, जडेजाची दमदार खेळी, पहिल्या दिवसअखेर भारत तीनशेपार

मुंबई: भारताने चेन्नई कसोटीत बांगलादेशविरुद्ध पहिल्या दिवसी गुरूवारी जोरदार कमबॅक केले. टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ६ बाग ३३९ धावा केल्या. भारतासाठी रविचंद्रन अश्विनने दमदार कामगिरी केली. अश्विन शतक ठोकत नाबाद राहिला. तर रवींद्र जडेजाही शतकाच्या जवळ आहे. तो ८६ धावांवर नाबाद आहे. या दोघांमध्ये १९५ धावांची भागीदारी झाली. बांगलादेशसाठी हसन महमूदने ४ विकेट मिळवल्या.

टीम इंडियाने टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग केली. या दरम्यान ९६ धावांवर भारताने ४ विकेट गमावल्या होत्या. तर १४४ धावांवर सहा बाद झाले होते. मात्र यानंतर जडेजा आणि अश्विनने मोर्चा सांभाळला. या दोघांदरम्यान १९५ धावांची भागीदारी झाली. अश्विन आणि जडेजा पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत नाबाद राहिले. यशस्वी जायसवालने अर्धशतक ठोकले.

अश्विनचे करिअरमधील सहावे शतक

अश्विन आठव्या स्थानावर बॅटिंगसाठी आला. त्याने या दरम्यान पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ११२ बॉलमध्ये नाबाद १०२ धावा ठोकल्या. अश्विनने या खेळीदरम्यान १० चौकार आणि २ षटकार ठोकले. अश्विनने जडेजासोबत मजबूत भागीदारी केली. जडेजाने ११७ चेंडूंचा सामना करताना नाबाद ८६ धावा केल्या. त्याने १० चौकार आणि २ षटकार ठोकले. यशस्वी जायसवालने चांगली कामगिरी केली. त्याने ११८ चेंडूत ५६ धावा केल्या.

रोहित,कोहली आणि गिल फ्लॉप

टीम इंडियाने १४ धावांवर आपली पहिली विकेट गमावली होती. रोहितने १९ चेंडूत ६ धावा केल्या. शुभमन गिल खातेही खोलू शकला नाही. त्याने ८ चेंडू खेळले. विराट कोहली ६ चेंडूंमध्ये ६ धावा करून बाद झाले. दरम्यान ऋषभ पंतने काही धावा केल्या. त्याने ५२ चेंडूत ३९ धावा केल्या. केएल राहुल १६ धावा करून बाद झाला.

बांगलादेशच्या हसनची चांगली सुरूवात

टीम इंडियाच्या सुरूवातीचे चार विकेट हसन महमूदने घेतले. त्याने पहिल्या १८ षटकांत ५८ धावा देत ४ विकेट मिळवले. या दरम्यान ४ मेडन ओव्हरनही काढले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -