Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीदररोज १० रूपयांची बचत करून बनू शकता लखपती, फक्त करावे लागेल हे...

दररोज १० रूपयांची बचत करून बनू शकता लखपती, फक्त करावे लागेल हे काम

मुंबई: भविष्य सुरक्षित बनवण्याबाबत जेव्हा लोकांना विचारले जाते तेव्हा त्यांचे उत्तर एकच असते ते म्हणजे पैस इतका वाचतोच कुठे की गुंतवणूक करता येईल. जर एखादी व्यक्ती सिगारेट पित असेल तर ती सवय सोडून हे पैसे गुंतवत असेल तर लाँग टर्ममध्ये त्यांच्याकडे लाखो रूपयांचा फंड जमा होऊ शकेल.

आज आम्ही तुम्हाला लखपती बनण्यासाठी आयडिया सांगत आहोत. लखपती बनण्याचे तुमचे स्वप्न म्यु्च्युअल फंडमध्ये एसआयपीमध्ये गुंतवणूक करून पूर्ण होऊ शकते. एसआयपीमध्ये गुंतवणूकदारांना कंपाऊंडिंगचा फायदा मिळतो आणि दीर्घ कालावधीमध्ये अधिक रिटर्न मिळण्याची शक्यता असते.

३०० रूपयांची एसआयपी करा सुरू

जर तुम्ही दररोज १० रूपयांची बचत करता आणि दर महिन्याला ३०० रूपयांच्या एसआयपी गुंतवणुकीचा पर्याय निवडता.तसेच दरवर्षी गुंतवणुकीत १० टक्क्यांची वाढ करत असाल तर पुढील ३० वर्षांत तुम्ही ४५ लाख रूपयांपेक्षा अधिक फंड बनवू शकता.

येथे आम्ही १५ टक्के वार्षिक परताव्याने ४५ लाखांचा फंड बनू शकेल. विशेष म्हणजे येथे तुम्ही केवळ ५ लाख ९२ हजार रूपये गुंतवत आहात. बाजारात अनेक असे फंड आहेत ज्यांनी लाँग टर्ममध्ये बंपर रिटर्न्स दिले आहेत.

काय आहे SIP?ne

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे एसआयपी. याच्या माध्यमातून तुम्ही दर महिन्याला म्यच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकता. एसआयपी पूर्णपणए बँक आरडीप्रमाणे असते. येथे तुम्हाला बँकेपेक्षा अधिक रिटर्न चांगले मिळतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -