अमरावती : हॉकीचे महान जादुगर मेजर ध्यानचंद यांची जयंती २९ ऑगस्ट निमीत्त देशात राष्ट्रीय क्रिडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच क्रीडा दिनाचे औचित्य साधत अमरावती शहर पोलिस आयुक्तलयातील पोलीस अंमलदार प्रविण आखरे यांनी जलतरण केंद्रात पाण्यावर तरंगत विविध प्रकारचे योगासने केली. प्रवीण आखरे हे जलतरण केंद्रात पोलिस अंमलदार म्हणून काम पाहत आहे.त्यांनी या पाण्यावर तरंगत व पाण्याच्या आत राहून योगासने करून ‘इंडीया बुक ऑफ रेकाॅर्ड’ व ‘एशिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ आपल्या नावे केला आहे.त्यांच्या या कामगीरीमूळे अमरावती शहर पोलिस विभागाच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला गेला असून महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची शान वाढली आहे.
प्रवीण यांनी पूर व नियंत्रण तसेच शोध व बचावपथकांमध्ये काम केलेेले असून त्यादरम्यान आतापर्यंत ७८ मृतदेह पूराच्या पाण्याच्या बाहेर काढले आणि एकूण ५५ लोकांचे प्राण वाचविले आहेत. प्रवीण यांनी आज क्रीडा दिनानिमित्त पाण्यावर तरंगत पवनमुक्तासन, भुजंगासन, पश्चिमोत्तानासन, वज्रासन, धनुरासन, मत्स्यासन, पादहस्तासन, सर्वांगासन ही आसने केली.