पंचांग
आज मिती आषाढ कृष्ण एकादशी शके १९४६, चंद्र नक्षत्र, रोहिणी, योग ध्रुव, चंद्र राशी वृषभ १०.१५ नंतर मिथुन, बुधवार, दिनांक ३१ जुलै २०२४, सूर्योदय ०६.१५ सूर्यास्त ०७.१४, चंद्रोदय ०३.०० उद्याची चंद्रास्त ०४.०० राहू काळ १२.४४ ते ०२.२२, कामिका एकादशी, नाना शंकर शेठ पुण्यतिथी.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे.
|
 |
वृषभ : आपले मित्र व सहकारी यांच्याशी संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा.
|
 |
मिथुन : परदेशी व्यक्तींचे आपले संबंध सुमधुर असणार आहेत. |
 |
कर्क : नोकरीमध्ये वरिष्ठांची मर्जी असणार आहे.
|
 |
सिंह : आपण प्रतिष्ठित व्यक्तीच्या सहवासात येणार आहात.
|
 |
कन्या : कुटुंबातील व्यक्तींच्या विचित्र वागण्याने आपणास त्रास होऊ शकतो |
 |
तूळ : व्यापार व्यावसायिकांना भागीदार आणि सहयोगी यांचे सहकार्य लागणार आहे. |
 |
वृश्चिक : आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत.
|
 |
धनू : कामाकडे आपण स्वतः जातीने लक्ष देणार आहात. |
 |
मकर : कुटुंबामध्ये शुभकार्याच्या योजना असणार आहे.
|
 |
कुंभ : व्यापार व्यवसायामध्ये काही ठोस परिणाम आपणास दिसणार आहेत.
|
 |
मीन : आपल्या आर्थिक योजना कार्यान्वित करणार आहात. |