मुंबई: आल्याचा चहा हा इम्युनिटी बूस्टर मानला जातो. आयुर्वेदातही याचे अनेक फायदे सांगितले आहेत. जर तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसांत हा चहा पित असाल तर यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच आजारही तुमच्यापासून दूर पळतील.
पावसामध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका असतो.यामुळे पोट, त्वचा तसेच गळ्यामध्ये इन्फेक्शन वाढते. पावसाळ्याच्या दिवसांत वारंवार सर्दी खोकल्याचाही त्रास होत असतो. घश्याचा त्रास तर अनेकांना सातत्याने होतो. मात्र रोगप्रतिकारक शक्ती तंदुरुस्त असेल तर हा त्रास होत नाही.
अशातच पावसाळ्याच्या दिवसांत आयुर्वेद इम्युनिटी बूस्टर आले आणि मुलेठीचा चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आले आणि मुलेठी हे इन्फेक्शन दूर करण्याचे काम करतात. यामुळे रोगप्रतिकार क्षमता मजबूत होते. गळ्याची खवखव दूर करण्यासीठी आल्याचा वापर केला जातो.
आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात ज्यामुळे सर्दी तसेच फ्लूचा धोका टळतो. जिंजरॉलमध्ये एनाल्जेसिक, अँटी बॅक्टेरियल आणि इन्फेक्शनमुळे होणारा ताप दूर करण्याचे गुण असतात.
मुलेठीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात ज्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते.