एकटाच राब राब राबला |
मागे कोणी ना उरला |
जसा पाण्याबरोबर मूरला | अहंकाराने ||१||
म्हणून खूप मेहनत करा |
क्षणिक लाभ न मनी धरा |
हळूहळू, पण पक्का तरा |
प्रेमाने ||२||
काम करत उत्साह वाहे |
आपल्या ध्येयाचे घोडे |
नेहमी या पुढे पुढे |
मदत कार्यात ||३||
वाट धरली पुण्याईची |
अवघड तरी समाजसेवेची |
ती कधी ही वाटावयाची | अभिमानाची ||४||
वाचन श्रवण तन |
असो नियमित योगासन |
योग्य शरीर बुद्धी मन | आत्मचिंतन ||५||
बचत करा सर्व काही |
झेपते त्यापेक्षा
थोडे अधिक वाही |
म्हणजे त्याचा योग्य होई | भविष्यात ||६||
लोकांपेक्षा फार
वेगळे नसावे |अगदी
लोकांसारखे न व्हावे |
पण मर्यादा राखून वागावे | शांतपणे ||७||
प्रत्येकाकडून घ्यावे |
अनावश्यक ते टाकून द्यावे |
डोळे उघडे ठेवून पहावे | निरिक्षणाने ||८||
करी निरिक्षण |
ना वाया जाई क्षण |
ना विसरे मागचे क्षण |
देवळेकर ||९||
शब्दश्री – विलास देवळेकर
मन चिंब पावसाळी ……
मन चिंब पावसाळी
झाडात रंग ओले।
घनगर्द सावल्यांनी
आकाश वाकलेले।।
पाऊस पाखरांच्या
पंखांत थेंब थेंबी।
शिडकाव संथ येता
झाडे निळी कुसुंबी।।
मन चिंब पावसाळी.
घरट्यात पंख मिटले
झाडात गर्द वारा।
गात्रात कापणारा
ओला फिका पिसारा।
या सावनी हवेला
कवळून घट्ट घ्यावे।
आकाश पांघरोनी
मन दूरदूर जावे।।
मन चिंब पावसाळी.
रानात एककल्ली
सुनसान सांजवेळी।
डोळ्यात गल्बताच्या
मनमोर रम्य गावी।
केसात मोकळ्या
त्या वेटाळुनी फुलांना।
राजा पुन्हा नव्याने
उमलून आज यावे।।
मन चिंब पावसाळी
मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या
डोळ्यात गुंतलेले
मन चिंब पावसाळी ………