Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीNitin Gadkari : ज्यांना मदत केली ते आज माझ्याविरोधात प्रचार करत आहेत

Nitin Gadkari : ज्यांना मदत केली ते आज माझ्याविरोधात प्रचार करत आहेत

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य

नागपूर : नागपूर लोकसभा (Nagpur Loksabha) मतदार संघाचे उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज पत्रकार परिषदेत वचननामा ते वचनपूर्ती हा जाहीरनामा जाहीर केला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या (Congress) काही नेत्यांबाबत वक्तव्य केलं. ‘अनेक काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्याकडे त्यांच्या कामासाठी आले आहेत परंतु ते आज माझ्या विरोधात प्रचार करत आहेत’ मात्र, याबद्दल कुठलाही आक्षेप नसल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.

गेल्या दहा वर्षांत नागपूर शहरात केलेली विकास कामे आणि पुढील पाच वर्षात शहराच्या विकासासाठी कुठली विकास कामे केली जाणार आहे याचा आलेख मांडताना गडकरी म्हणाले, गेल्या पंधरा वीस दिवसांपासून शहरातील विविध भागात प्रचार सुरू असताना लोकांचा प्रतिसाद मिळतो. मात्र, माझ्यासोबत काम करणारे किंवा ज्यांना मी अनेक कामात मदत केली आहे असे अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते व नेते माझ्या विरोधात प्रचार करत आहेत.

शहरात दोन तीन दिवसापूर्वी एक पदाधिकारी विरोधात फिरत होते, जे तुरुंगात जाण्याच्या स्थितीत होते. त्यांना अटक होण्यापासून मी वाचवले आहे. मात्र, ते आज विरोधात प्रचार करत आहेत. त्याला माझा काही आक्षेप नसून मी विरोधात असलेल्यांचीही कामं केली आहेत. मी कधीही जातीभेद किंवा पक्षभेद केला नाही. जो माझ्याकडे आला आहे त्याचं काम केलं, असंही गडकरी म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -