Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीVasant More: मी कलाकार आहे की कार्यकर्ता ते समजेल

Vasant More: मी कलाकार आहे की कार्यकर्ता ते समजेल

वंचितच्या वसंत मोरेंचा जितेंद्र आव्हाडांवर पलटवार

पुणे : जितेंद्र आव्हाड हे माझ्यापेक्षाही मोठे कलाकार आहेत. वसंत मोरे हा कलाकार नाही. त्यांना वसंत मोरे समजला नाही. समजायचे असेल तर त्यांना पुण्यात यावे लागेल. पुण्यात वसंत मोरेंचे काम पाहावे लागेल. त्यानंतर वसंत मोरे कलाकार आहे की कार्यकर्ता हे समजेल, असा पलटवार वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि पुण्याचे उमेदवार वसंत मोरे यांनी आव्हाडांवर केला आहे.

वसंत मोरे म्हणाले की, चेहऱ्यावरून नव्हे तर वसंत मोरेंच्या कामावरून प्रकाश आंबेडकर मला ओळखतात. ही माझी पावती आहे. जितेंद्र आव्हाडांना कधी वसंत मोरेंचे काम बघायची संधी मिळाली नाही. ज्या भागात मी नगरसेवक आहेत. तिथे १५ वर्षांत मी केलेले काम पाहायचे असेल तर जितेंद्र आव्हाडांनी मला एक दिवस द्यावा. माझ्या वार्डाची सहल करून आणतो. मग वसंत मोरेचे काम काय, किती लोकांसाठी काम करतो हे कळेल, असे उत्तर मोरेंनी दिले.

घरात बोलावून मारणाऱ्यांना सर्वसामान्यांचे काय दु:ख कळणार

त्याशिवाय एवढ्या मोठ्या पक्षाचा नेता इतक्या खालच्या पातळीवर बोलत असेल. मी मुरलीची मुरली वाजवतो की जितेंद्र आव्हाडांची पुंगी वाजवतो हे भविष्यात कळेल. पुण्यात आले, इथे बोलले, जितेंद्र आव्हाडांनी जो गरिबांवर अन्याय केलाय, फेसबुकवर लिहिलेल्या एकाला घरात बोलावून मारले, अशा नेत्याला सर्वसामान्यांचे दु:ख काय कळणार आहे. वसंत मोरेंचे तुम्हाला आव्हान आहे. मी काय काम केले असेल ते पाहायला पुण्यात या, असे वसंत मोरे यांनी म्हटले.

गोड आठवणी माणसाने विसरू नये

गुढीपाडव्यानिमित्त आज १०० टक्के शिवतीर्थाची आठवण येते, आज पहिल्यांदाच गुढी उतरताना मी माझ्या घरी असेन. गेली कित्येक वर्षे मी गुढी उतरताना मुंबईत शिवतीर्थावर होतो. आज मी घरी असणार आहे. आता त्या विषयात जाऊ शकत नाही. ज्या आठवणी आहेत त्या कायम राहतात. गोड आठवणी माणसाने कधी विसरू नये आणि मी ते विसरणारही नाही, काही आठवणी या असे भाष्य वसंत मोरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यावर केले. वसंत मोरे हे थेट संपर्कावर भर देत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -