नवी दिल्ली : ‘काँग्रेसने गेली ५० वर्षे निवडणुकांमध्ये भारतीयांची मते मिळविण्यासाठी ‘गरिबी हटाव’चा नारा दिला, पण देशातल गरीबी हटविण्याचे काम आम्ही केले. आमच्या कामाचा फरत देशातील कानाकोपऱ्यात पहावयास मिळत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.
देशात काही महिन्यातच लोकसभेच्या निवडणुका होणार असून सर्वपक्षांनी तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी केरळ दौऱ्यावर आहेत. येथील सभेतून मोदींनी काँग्रेसवर टीका केली आहे.
‘केंद्रातील भाजप सरकारच्या नितीचा फरक देशामध्ये आता सर्वत्र दिसू लागला आहे. काही दिवसापूर्वी एक अहवाल आला होता, अहवालात देशातील २५ कोटी लोक गरिबीतून मुक्त झाले आहेत. या देशात गेल्या पाच दशकापासून केवळ निवडणूकांमध्ये मते मिळविण्यासाठी, देशातील जनतेची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेसने केवळ आजवर गरिबी हटावचा नारा दिलेला आहे. पण आमच्या सरकारने कोणत्याही प्रकारची नारेबाजी न करता हे काम केले असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आमचा संकल्प असा असला पाहिजे की, आम्ही प्रत्येक बुथ जिंकू,आपण प्रत्येक बूथ जिंकू शकलो तर केरळमधील निवडणुका जिंकू शकतो. तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल आणि प्रत्येक मतदाराकडे लक्ष द्यावे लागेल. केरळमधील डाव्या लोकशाही आघाडी आणि युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट यांचा ट्रॅक रेकॉर्ड भ्रष्टाचाराच्या इतिहासाचा समानार्थी आहे. हे लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे, असे आवाहन यावेळी मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना केले.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी आपल्या भाषणातून दावा केला की, भाजप हा भारतातील एकमेव पक्ष आहे. ज्याचा वेगवान विकासाचा ट्रॅक रेकॉर्ड आणि भविष्यासाठी स्पष्ट दृष्टी आहे. केरळच्या लोकांनी दाखवलेले प्रेम आणि आपुलकी पाहून मी भारावून गेलो आहे, असेही मोदी म्हणाले.