Saturday, July 20, 2024
Homeक्रीडाIND vs AFG: दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताचा विजय, अफगाणिस्तानला केले क्लीन स्वीप

IND vs AFG: दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताचा विजय, अफगाणिस्तानला केले क्लीन स्वीप

बंगळुरू: भारतीय संघ आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने दमदार मालिका विजय मिळवला आहे. तिसऱ्या सामन्यात दुसऱ्या सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला.

भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१२ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानला विजयासाठी २१३ धावा हव्या होत्या. मात्र अफगाणिस्तानच्या संघाने २१२ धावा केल्या आणि सामना बरोबरीत झाला. त्यानंतर पहिली सुपर ओव्हर झाली. मात्र सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी १६-१६ धावा केल्या.

यामुळे दुसऱ्यांदा सुपर ओव्हर घेण्यात आले. यात भारताने ११ धावा केल्या तर अफगाणिस्तानच्या संघाला केवळ एक धाव करता आली. या पद्धतीने भारताने ही मालिका ३-० अशी जिंकली. भारताने टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ९व्यांदा एखाद्या संघाला क्लीन स्वीप केले आहे. यासोबतच भारताच्या नावावर सर्वाधिक वेळा क्लीन स्वीप करण्याचा रेकॉर्ड झाला आहे.

भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर सामन्यात एक वेळ अशी स्थिती आली होती की भारतीय संघाने अवघ्या २२ धावांमध्ये ४ विकेट गमावल्या ोत्या. यशस्वी ४ धावा करून बाद झाला. तर विराट कोहली पहिल्याच बॉलवर पॅव्हेलियनमध्ये परतला. शिवम दुबेला १ धावा तर संजू सॅमसन शून्यावर बाद झाला.

यानंतर रोहित शर्माने ६४ बॉलमध्ये शतक ठोकत नवा इतिहास रचला. रिंकू सिंहनेही आपले टी-२० आंतरराष्ट्रीयमधील अर्धशतक ठोकले. त्याने ३६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सामन्यात रोहितने ६९ बॉलमध्ये नाबाद १२१ धावा केल्या. यात त्याने ८ षटकार आणि ११ चौकार लगावले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -