Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीअसल्या कोल्हेकुईला दाद देत नसल्याचा मंत्री भुजबळांचा पलटवार

असल्या कोल्हेकुईला दाद देत नसल्याचा मंत्री भुजबळांचा पलटवार

नाशिक : जरांगेंना जास्त घेतल्यामुळे विसरल्यासारखं होत असेल, ते एकतर हॉस्पिटलमध्ये राहतात नाहीत, तर बाहेर राहतात. १२ इंच छाती आहे, ठोकून ठोकून उगाच जास्तीचं काही होईल. कोणी आरे म्हटले तर कारे कोणीतरी करणार आहे. छगन भुजबळ असल्या कोल्हेकुईला दाद देत नाही, असा टोला मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला.

ते म्हणाले की, आज जाहीर सभा झाली. सभेमधील अर्धे भाषण भुजबळांवरच होते. माझं नाव नाही घेतलं, मग भाषण करणार तरी काय? बाकी लेकरं बाळं असं नेहमीचं होतं. त्यांनी काल चर्चा करताना त्यांनी सगेसोयरेंचा मुद्दा घेतलाच नाही. त्यामुळे स्मरणशक्तीमध्ये गडबड असल्याचे दिसते. सर्व काही भुजबळांनी जाळलं म्हणतात, मराठ्यांना तुम्ही डाग लावला म्हणता, मराठ्यांच्या वाट्याला जाऊ नका, वाट्याला गेलात तर काय होतं ते लक्षात ठेवा असं म्हणतात, तर मग बीडमध्ये जे काही घडलं ती जाळपोळ केल्याची अप्रत्यक्ष कबूली आहे का? अशी विचारणा केली.

भुजबळ म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह दाखल करून घेतल्याने दिलासा मिळाला आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, अशीच आमची मागणी आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -