Monday, April 28, 2025
Homeताज्या घडामोडीवेब सिरीजचं वेड, 'सहज करुन पहायचा' म्हणुन केला खुन...

वेब सिरीजचं वेड, ‘सहज करुन पहायचा’ म्हणुन केला खुन…

एक मुलगी सतत कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यांवर आधारित वेब सीरिज आणि सिनेमे पाहायची, पुस्तकं वाचायची. गुन्हेगारीच्या विचारांमध्ये ती इतकी गुंतली की तिला स्वतःला एक खून करायची इच्छा झाली. आणि सहजच फक्त करुन पाहायचा म्हणून खुन केला .

ही गोष्ट आहे जुंग यू-जुंग हिची. दक्षिण कोरियात राहणाऱ्या 23 वर्षांच्या जुंग हिने अनेक क्राईम शोज पाहून ठेवले होते, तिच्या वेब सर्च हिस्ट्रीमध्येही सतत अशाच गोष्टी असायच्या. खून कसा करायचा, मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, वगैरे. ती तिच्या आजोबांसोबत राहायची, त्यामुळे बोलायला फार कुणी नव्हतं. अशात ती ऑनलाईन अशा लोकांना शोधू लागली जे त्यांच्या स्वतःच्या घरी तिला शिकवू शकतील. 50 पेक्षा जास्त लोकांशी संपर्क साधल्यानंतर ती अखेर 26 एका वर्षीय महिलेच्या संपर्कात आली, जी आग्नेय कोरियामधील बुसानमध्ये राहायची.

तिने त्या महिलेशी संपर्क साधला, आणि एका शाळेतील मुलीचा गणवेश ऑनलाईन विकत घेत तिच्या घरी इंग्लिशच्या शिकवणीसाठी गेली. अखेर संधी साधून त्या शिक्षिकेचा खून केला. जुंगने तिच्यावर 100 पेक्षा जास्त वार केले, नंतर तिच्या शरीराचे तुकडे करून एका बॅगमध्ये भरले, आणि एका कॅबमधून दूर जंगलात जाऊन ती बॅग फेकून आली.

‘सहज करुन पहायचा म्हणुन केला खुन’

रक्ताने माखलेली बॅग जंगलात फेकून देण्यासाठी जुंगने एक कॅब बुक केली. पण एका कॅब ड्रायव्हरला संशय आला. शेवटी त्याने जुंगविषयी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तिला अटक करण्यात आली.

आधी तिनं कारणं सांगितली, की कुणीतरी दुसऱ्यानेच त्या महिलेला मारलं आणि आपण फक्त त्या मृतदेहाची विल्हेवाट लावली, किंवा अचानक झालेल्या भांडणातून रागाच्या भरात हे सारंकाही घडलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -