Tuesday, April 22, 2025
Homeक्रीडाENG vs NED: स्टोक्सचे शतक, मोईन-रशीदची जबरदस्त गोलंदाजी, नेदरलँड्सला हरवण्यात इंग्लंडला यश

ENG vs NED: स्टोक्सचे शतक, मोईन-रशीदची जबरदस्त गोलंदाजी, नेदरलँड्सला हरवण्यात इंग्लंडला यश

पुणे: इंग्लंडने(england) नेदरलँड्सला(netherlands) १६० धावांनी हरवले. दरम्यान, इंग्लंडचा संघ आधीच सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. नेदरलँड्ससमोर विजयासाठी ३४० धावांचे आव्हान होते. मात्र नेदरलँड्सच्या संघाला ३७.२ षटकांत केवळ १७९ धावा करता आल्या. या पद्धतीने जोस बटलरच्या नेतृत्वात गतविजेत्या इंग्लंडने अगदी सहज हा सामना आपल्या नावे केला.

नेदरलँड्ससाठी तेजा निदामनुरूने सर्वाधिक ३४ बॉलमध्ये ४१ धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत २ चौकार आणि ३ षटकार ठोकले. याशिवाय स्कॉट एडवर्ड्सने ४२ बॉलमध्ये ३८ धावा केल्या. सिब्रंड एंगलब्रंटने ४९ बॉलमध्ये ३३ धावांची खेळी केली. नेदरलँड्सचे ७ फलंदाज दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाही.

इंग्लंडसाठी आदिल रशीद आणि मोईन अलीने ३-३ विकेट मिळवल्या. डेविड विलीला २ विकेट मिळवण्यात यश मिळाले. याशिवाय क्रिस वोक्सने १ विकेट मिळवला.

टॉस जिंकत इंग्लंडने घेतला फलंदाजीचा निर्णय

याआधी टॉस जिंकत फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंडने ५० षटकांत ९ बाद ३३९ धावांचा स्कोर उभा केला. इंग्लंडसाठी बेन स्टोक्सने शानदार शतक ठोकले. बेन स्टोक्सने ८४ चेंडूत १०८ धावांची खेळी केली. डेविड मलानने ७४ बॉलमध्ये ८७ धावांचे योगदान दिले. क्रिस वोक्सने ४५ चेंडूत ५१ धावा केल्या. नेदरलँड्सकडून बेस डी लीडे यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३ विकेट मिळवल्या.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -