लखनऊ: नेदरलँड्स(netherlands) आणि अफगाणिस्तान(afganistan) यांच्यात झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने नेदरलँड्सला ७ विकेट राखून हरवले आहे. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे त्यांच्या सेमीफायनलमध्ये जाण्याच्या आशा टिकून आहेत.
अफगाणिस्तानचा विश्वचषकातील हा चौथा विजय आहे. यासोबतच ते पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आले आहेत. तसेच त्यांनी सेमीफायनलमध्येही आपला दावा ठोकला आहे. लखनऊमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात नेदरलँड्सने पहिल्यांदा खेळताना फक्त १७९ धावा केल्या होत्या.
याच्या प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानने केवळ ३१.३ षटकांत तीन विकेट गमावताना हे आव्हान पूर्ण केले. या विश्वचषकातल अफगाणिस्तानचा हा सलग तिसरा विजय आहे. नेदरलँडसआधी अफगाणिस्तानने पाकिस्तान आणि श्रीलंकेला धूळ चारली होती.