Saturday, July 5, 2025

पंतप्रधान मोदींनी UAEच्या राष्ट्रपतींशी केली बातचीत, दहशतवादाबद्दल व्यक्त केली चिंता

पंतप्रधान मोदींनी UAEच्या राष्ट्रपतींशी केली बातचीत, दहशतवादाबद्दल व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयानशी फोनवर चर्चा केली आणि पश्चिम आशियाच्या स्थितीसह अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.


इस्त्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील युद्धाचे क्षेत्र पश्चिम आशियात येते. गेल्या ७ ऑक्टोबरपासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे आणि हजारो लोक मारले गेले आहेत. या दरम्यान, जग भारताकडे आशेने बघत आहे आणि जर कोणी शांतीचे पाऊल उचलेल तर ते पाऊल भारत उचलणार आहे.



यूएईच्या राष्ट्रपतींशी काय झाले पंतप्रधान मोदींचे बोलणे


पंतप्रधान मोदींनी आपल्या अधिकृत X हँडलवरील एक पोस्टमध्ये सांगितले, पश्चिम आशियामधील स्थितीबाबत माझे बंधू संयुक्त अरब अमिरातचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्यासोबत चांगली चर्चा झाली. आम्ही दहशतवाद, बिघडत चाललेली सुरक्षा स्थिती आणि नागरिकांचे जीव यावर चिंता व्यक्त केली. आम्ही सुरक्षा आणि मानवीय स्थितीबाबत लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी सहमत आहोत आणि हे सर्वांच्याच हिताचे आहे.


 


गेल्या अनेक दिवसांपासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात जोरदार युद्ध आहे. हमासने केलेल्या हल्ल्यानंतर इस्त्रायलकडून त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. इस्त्रायलने गाझा पट्टीवर जोरदार हल्ले करत गाझापट्टी उद्ध्वस्त केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा