Sunday, April 20, 2025
Homeक्रीडाIND vs PAK: कुलदीपचा पाकिस्तानला जोरदार 'पंच', भारताचा २२८ धावांनी विजय

IND vs PAK: कुलदीपचा पाकिस्तानला जोरदार ‘पंच’, भारताचा २२८ धावांनी विजय

कोलंबो: आशिया चषक २०२३च्या (asia cup 2023) सुपर ४च्या फेरीतील सामन्यात भारताने (india) पाकिस्तानवर (pakistan) जबरदस्त विजय मिळवला आहे. भारताने पाकिस्तानला थोडेथोडक्या नव्हे तर तब्बल २२८ धावांनी हरवले. राखीव दिवशी रंगलेल्या या सामन्यात भारताने बाजी मारली. भारताने दिलेले ३५७ धावांचे आव्हान गाठताना पाकिस्तानचा घामच निघाला. त्यांना ३२ षटकांत केवळ १२८ धावा करता आल्या.

विराट कोहली आणि लोकेश राहुल यांची प्रत्येकी शतके तर सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २ बाद ३५६ धावांचा डोंगर पाकिस्तानसमोर उभारला होता. हा सामना रविवारी होणार होता. मात्र रविवारी भारताच्या २४.१ षटकांत २ बाद १४७ धावा झाल्या होत्या.पावसाने खोडा घातल्याने सामना सोमवारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानंतर सोमवारी पुन्हा खेळ सुरू करण्यात आला. तेव्हा विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी जबरदस्त शतके ठोकली. राहुलने १०६ चेंडूत १११ आणि कोहलीने ९४ बॉलमध्ये १२२ धावांची नाबाद खेळी केली. दोघांनी १९४ चेंडूत २३३ धावांची भागीदारी केली. त्यांच्या या जबरदस्त खेळीच्या जोरावर भारताने २ बाद ३५६ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघाला दीडशे धावांचा टप्पाही गाठता आला नाही. पाकिस्तानचे केवळ चारच फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकले. या सामन्यात कुलदीप यादवच्या गोलंदाजीने किमया साधली. त्याने तब्बल ५ विकेट घेत पाकिस्तानच्या डावाला खिंडार पाडले. तर जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -