मुंबई : गेल्या आठवड्यात अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या होत्या. आता पुन्हा शुक्रवारी अठरा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत.
यात नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त म्हणून रुपिंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सोनिया सेठी यांची महसूल आणि वनविभाग मंत्रालयाच्या पीआरपदावर नियुक्ती झाली आहे. अविनाश पाठक यांची बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. ओबीसी बहुजन कल्याण पुणे विभागाचे संचालक म्हणून प्रवीणकुमार देवरे यांची बदली झाली आहे.
बदली झालेले अधिकारी व ठिकाण
१. सोनिया सेठी, आयएएस (1994) यांची PS (R&R), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय
२. रुपिंदर सिंग, आयएएस (1996) यांची निवासी आयुक्त आणि PS, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली
३. गोरक्ष गाडीलकर, आयएएस (2013) संचालक, रेशीम, नागपूर
४. प्रकाश बी.खपले, आयएएस (2013) महाडी, स्कॉम, औरंगाबाद येथे सह व्यवस्थापकीय संचालक
५. अविनाश पाठक, आयएएस (2013) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड
६. गुलाब आर.खरात, आयएएस (2013) शिवशाही पुनर्वास प्रकल्प, मुंबई
७. प्रविणकुमार देवरे, आयएएस (2013) संचालक OBC बहुजन कल्याण, पुणे
८. मिलिंदकुमार डब्लू.साळवे, आयएएस (2013) सहआयुक्त, राज्य कर, औरंगाबाद
९. सतीशकुमार डी. खडके, आयएएस (2014) नाशिक मेट्रो क्षेत्र विकास प्राधिकरण
१०. संजय एस. काटकर, आयएएस (2014)-सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई
११. पराग एस. सोमण, आयएएस (2014)-मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई
१२. अनिलकुमार के. पवार, आयएएस (2014) आयुक्त, वसई-विरार महानगरपालिका
१३. सचिन बी. कालत्रे, आयएएस (2014)-व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला
१४. मनोज व्ही. रानडे, आयएएस (2014) संचालक, महापालिका प्रशासन, मुंबई
१५. नेहा भोसले- प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, जव्हार, पालघर
१६. मुरुगनंथम एम. (२०२०)-प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, गडचिरोली
१७. रिचर्ड यंथन (२०२०)- प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, धारणी, अमरावती
१८. कार्तिकेयन एस. (२०२०)-प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, किनवट, नांदेड
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra